राशन कार्डधारकांसाठी मोदी सरकारने दिली खुशखबरी ! आणखी तीन महिने मिळणार मोफत राशन वाचा सविस्तर

      नमस्कार मित्रांनो परत एकदा  KJMEDIA च्या नवीन लेखांमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो राशन कार्डधारकांसाठी एक खुशखबर आहे. मोदी सरकारने बुधवारी झालेल्या एका बैठकीत राशन कार्डधारकांसाठी खुशखबर दिली आहे.ती म्हणजे आता सर्व राशन कार्ड धारकांना डिसेंबर पर्यंत फ्री मध्ये राशन देण्याचे जाहीर केले आहे.           


                                                                         माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली या बैठकीत  प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) यांतर्गत राशन कार्ड धारकांची राशन अजून तीन महिने फ्री मध्ये वाढवून देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राशन कार्ड धारकांना आता तीन महिने म्हणजेच ऑक्टोंबर,नोव्हेंबर आणि डिसेंबर फ्री मध्ये राशन मिळणार आहे.

एप्रिल 2020 मध्ये सुरू झाली होती ही योजना

                       केंद्र सरकारने कोरोना काळात म्हणजे 2020 झाली ही योजना चालू केली होती. त्यानंतर मार्च 2022 रोजी परत या योजनेला सहा महिने वाढून देण्यात आली होते. आणि परत आता  सरकारने बुधवारी माननीय पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेऊन या योजनेला तीन महिने वाढवून दिले आहे. म्हणजेच आता डिसेंबर पर्यंत हे फ्री चे राशन मिळणार आहे.


 80 करोड जनतेला होणार लाभ

                     केंद्र सरकारने ही घोषणा केल्यानंतर या योजनेतून जवळपास देशातील 80 करोड जनतेला याचा लाभ मिळणार आहे. या योजनेला वाढवून मिळण्यासाठी सरकारने काही महिन्यापूर्वी इशारा दिला होता. केंद्रीय खाद्य विभागाचे सचिव यांनी हा इशारा दिला होता. आपणास एक सांगावेसे वाटते की पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) ही जगातील सर्वात मोठी योजना आहे.


या योजनेला 3.40 लाख करोड झाले खर्च

                            केंद्र सरकारने या योजनेला पुढे नेण्यासाठी आपल्याकडे असलेला राशनच्या स्टॉकची काही दिवसांपूर्वी समीक्षा केली होती. असा एक अंदाज काढला जात आहे की या योजनेवर 3.40 लाख करोड रुपये खर्च झाले आहे. केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत गरीब राशनधारक परिवारांना प्रति व्यक्ती 5 किलो राशन फ्री मध्ये दिले जाते.सुरुवातीला या योजनेमध्ये एका परिवाराला एक किलो हरभरा डाळ आणि काही आवश्यक मसाल्यांच्या किट दिल्या होत्या. चला तर मित्रांनो ही माहिती आपल्या जवळील गरीब कुटुंबाला जरूर कळवा कारण राशन देणारे हे भ्रष्टाचार करणार नाही. ही माहिती ते सांगणार नाही.त्यामुळे ही माहिती आपण जरूर शेअर करा आपणाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कॉमेंट करून कळवा धन्यवाद

                                               बातमी सौजन्य झी न्यूज हिंदी


1 टिप्पण्या

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने