नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे.मित्रांनो आपणास माहीतच आहे.की महाराष्ट्रातील जालना जिल्हा हा मराठवाड्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. स्टील उद्योग जालना जिल्ह्याची ओळख आहे. च परंतु आपणास माहित आहे काय? जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक पर्यटन स्थळे आहेत. जी आपणाला माहित आहे काय? म्हणूनच आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत की जालना जिल्ह्यामध्ये कोण कोणती अशी पर्यटन स्थळे आहेत. ज्या ठिकाणी आपणास आवर्जून भेट द्यायला पाहिजे. चला तर मग आपण जाणून घेऊयात कोणकोणती स्थळे आहेत.
गणेशाचे पूर्ण पीठ श्रीक्षेत्र राजुर संत रामदास स्वामींचे जन्मस्थान जाम समर्थ,अंबडची देवी मच्छोदरी देवी, जैन धर्मियांचे गुरु गणेश, तपोधाम डोणगाव येथील दर्गा शरीफ,आदी मोठी धार्मिक स्थळे जालना जिल्ह्यात पाहण्यासाठी आहेत.याव्यतिरिक्त जाळीच देव सोमठाणा गड , व कलिंका माता गड,अशी प्रेक्षणीय स्थळे सुद्धा जालना जिल्ह्यात आहे.
भोकरदन तालुक्यातील राजुर हे गणेशाचे पूर्ण पीठ म्हणून गणेश पुराणांमध्ये याचा उल्लेख आहे. नवसाला पावणारा गणपती अशी ओळख राजुर गणपती यांची आहे. गेल्या काही वर्षात मंदिर परिसराचा चेहरा मोहरा पार बदलला असून नुतनीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. गणेश चतुर्थीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते
महानुभाव पंथीयांचे देवस्थान जाळीचा देव हे ठिकाण ही या जिल्ह्यात खूप प्रसिद्ध आहे. श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने जाळीचा देव अर्थात वालसावंगी परिसरातील हा निसर्गरम्य परिसर फार प्रसिद्ध आहे आहे. जाळीचा देव संस्थाना जवळच असलेले कालिंका माता गड हे सुद्धा एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. बदनापूर तालुक्यात असणारा सोमठाणा गड हे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. रेणुका देवीचे मंदिर आणि हिरवा शालू नेसलेले सोमठाणा गड पाहण्यासारखा आहे अंबड येथे मत्सोदरी देवीचे मोठे मंदिर असून तिथे नवरात्रीतील दिवसांमध्ये उत्सव हा पाहण्यासारखा असतो. मासोळी सारख्या आकाराच्या डोंगरावर हे मंदिर आहे.अंबड येथे अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले बारव इतिहासातील वैभव यांची साक्ष देते.
अंबड जवळ समर्थ रामदास स्वामींची जन्मभूमी जाम समर्थ राम भक्तांना खुणावत असते. या ठिकाणी प्राचीन राम मंदिर असून मंदिरातील मूर्ती रामदास स्वामींनी स्थापित केल्या आहेत. जैन धर्मातील बांधवांसाठी जालना शहरातील गुरु गणेश भवन हे एक महत्त्वाचे पवित्र ठिकाण आहे. गुरु गणेश हे कर्नाटक केसरी या नावाने देखील ओळखले जाते. श्री वर्धमान स्थानक वासी जैन श्रावक संघ या जैन ट्रस्टमार्फत या स्थळांची देखरेख व विकासाचे कामे केली जातात. येथील गोशाळा मराठवाड्यामध्ये सर्वात मोठी गोशाळा म्हणून ओळखली जाते.डोनगाव येथे दाऊदी बोरा समाजाचे मौलाना नरूद्दीन यांचा दर्गा आहे नुरुद्दीन यांना वली अल-हिंद या पदावर दाऊदी बोहरा दावत यमेन केंद्र तर्फे नियुक्त करण्यात आले होते.मोलना नरुद्दीन हे शिक्षण घेण्यासाठी कैरो इजिप्त येथे गेले होते. त्यांचा मृत्यू डोणगाव येथे झाला.
मंठा येथील देवीचे स्थान शिल्पकलेचे प्रणेते हे हेमाद्रीपंत यांचे हेलस गाव अनवा येथे असलेले पुरातन हेमाडपंथी शिवमंदिर ,जालन्यात असणारे मुंबादेवी मंदिर, माळ्यावरचा गणपती दत्तधाम, आनंदी स्वामी मंदिर, रामानंद महाराजांनी बांधलेले राम मंदिर, काली मशीद आधी ठिकाणांना ही पर्यटक भेट देतात.
जालना जिल्ह्यात जाण्यासाठी कसे असतील सोयीचे मार्ग
जालना हे दक्षिण मध्य रेल्वेचे महत्त्वाचे रेल्वे स्थानक जालना येथे उतरून रस्ते मार्गाने सरांना भेटी देणे शक्य आहे जालना व तालुक्यात स्थानी हॉटेल लॉज साहेब मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर जालना असल्यामुळे लोणार सिंदखेडराजा देऊळगाव राजा साखरखेडा अधि ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना जालन्यातूनच जावे लागते.