शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता युरिया सारखेच डीएपी खत सुद्धा देता येणार ड्रिप इरिगेशनने ! वाचा सविस्तर !


        नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो आपणास माहीतच आहे की भारत हा कृषिप्रधान देश आहे.म्हणून भारतामध्ये कृषी क्षेत्रामधील उत्पादनांना फार मागणी आहे. यामध्ये आधुनिक अवजारे, खते  किंवा कीटकनाशक फवारणी औषधे असतील अशा वस्तूंना फार मागणी आहे.

                   जसे जसे आधुनिक तंत्रज्ञान अवगत होत आहे.तशी तशी शेती आणखी सोपी होत जात आहे. यामध्ये अवजारांच्या मदतीने शेतीच्या मशागती सोप्या झाले आहेत. तर औषधांच्या मदतीने झाडांवरील रोगराईवर नियंत्रण ठेवून उत्पादन वाढीस मोठी मदत झाली आहे. दिवसेंदिवस नवनवीन प्रयोग शेतीमध्ये होताना दिसत आहे . शेतीला खते देण्यासाठीया एक प्रयोग म्हणजे   युरिया हे खत   ड्रीपच्या माध्यमातून आपण  शेतीला देऊ शकलो.यामधूनच आता एक नवीन तंत्रज्ञान आले आहे.

म्हणजे देशातील पहिले द्रव्य स्वरूपातील नॅनो डी ए पी खत यावर्षी च्या हंगामात शेतकऱ्यांना मिळणार आहे.प्रारंभी नॅनो युरिया शेतकऱ्यांच्या हातात पडला. आता नॅनो डीएपी खत शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळे एका पोत्यामागे शेतकऱ्यांची 750 रुपयांची बचत होणार आहे.

            पिकांची जोमाने वाढ व्हावी यासाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या तीन घटकांची आवश्यकता असते. डी ए पी मध्ये हे तीनही घटक योग्य प्रमाणात उपलब्ध असल्याने त्यामुळे यावर्षी डी ए पी खताची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु त्याचे दर अधिक असतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडते. यावर्षी प्रथमच नॅनो डी ए पी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे 1350 रुपयांची खताची बॅग नॅनो डीएपी मुळे 600 रुपयात लिक्विड स्वरूपात बॉटल उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पोत्यामागे 750 रुपया ची बचत होणार आहे 

      डीएपी निर्मितीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीचा पोत खराब होत आहे. त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम होतो.आता द्रव्य स्वरूपातील नॅनो डीएपी फवारणीतून देता येणार आहे. त्यामुळे पौष्टिकता गुणवत्ता उत्पादकता वाढवण्यासोबत आर्थिक भार कमी होण्यास मोलाची मदत मिळणार आहे.

                   राज्यभरामध्ये नॅनो डी ए पी खत उपलब्ध होण्यासाठी शासनाचे पत्र जिल्ह्यांना मिळाले आहे. त्याच अनुषंगाने शासनामार्फत खतांच्या यादीमध्ये नॅनो डीएपी चा समावेश करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने