नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे.मित्रांनो आपणास माहिती आहे की,आता सध्याचे युग कशाचे आहे हे युग म्हणजे आधुनिकतेचे युग आहे, म्हणून दिवसेंदिवस विज्ञानाचे नवनवीन शोध आणि त्यात प्रगती होताना आपणास दिसत आहे. यामध्ये एक शोध म्हणजे मोबाईल..... हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.त्यामुळे मोबाईल किती महत्त्वाचा आहे हे मोबाईल नसल्यावर आपणास कळते, परंतु या मोबाईलमुळे काही चांगले परिणाम तर आहेच परंतु दुष्परिणाम सुद्धा आहे. सद्यस्थिती त आपण बघितले तर,मोबाईलची क्रेझ युवक जगतात खूप वाढत वाढली आहे.चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा असलेला मोबाईल ,महागडे, ब्रँडेड कंपनीचे मोबाईल युवक आवर्जून खरेदी करत आहे. त्यामुळे मोबाईल हा आपल्यासाठी फार महत्त्वाचा बनला आहे.अनेक कामे मोबाईल मुळे सोपी झाली आहे.
बँकिंग सेवा असो किंवा काही ऑनलाईन ची कामे असतील सर्व ची सर्व कामे आता मोबाईल मुळे कोणत्याही क्षणी शक्य झाली आहे. परंतु मोबाईलची संख्या जशी जशी वाढली तशी तशी मोबाईल हरवण्याची ही संख्या जास्त वाढली आहे. यामध्ये चोरीचे प्रमाण मध्ये खूप वाढ झाली आहे. त्यामुळे आपला मोबाईल चोरीला गेल्यास आपण कुठेही तक्रार केली तर आपला मोबाईल आपल्याला भेटल याची काही गॅरंटी नाही.पोलीस स्टेशनला मोबाईल चोरीच्या तक्रारी खूप वाढल्या आहे. त्यामुळे दूरसंचार विभागाने यासाठी एक नवीन वेबसाईट तयार केलेली आहे.
भारतात मोबाईल हरवल्यास तो परत मिळेल याची शास्वती आता राहिली नाही. त्यामुळे लोकांना दिलासा देण्यासाठी दूर संचार विभागाने म्हणजेच सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटीटी रजिस्टर (CEIR) नावाची एक नवीन वेबसाईट सुरू केली आहे. ही सेवा आधी काही राज्यांमध्येच सुरू होती परंतु, आता सर्व राज्यांसाठी ही सेवा उपलब्ध झाली आहे.
या वेबसाईटवर तुम्ही चोरी गेलेल्या फोनची त्वरित तक्रार करू शकता. त्यासाठी विविध तपशिलासह एक फॉर्म भरावा लागेल. तक्रारीनंतर फोनचा IMEI क्रमांक ब्लॉक आणि ट्रेक केला जाईल. त्यानंतर दुसऱ्या सिम कार्ड चा वापर फोनचे लोकेशन ट्रॅक होईल. विशेष म्हणजे या वेबसाईटवर स्मार्टफोन ब्लॉक केल्यावर तो केंद्रीय डेटाबेस वरही मेसेज केला जातो. मोबाईल ब्लॉक करण्यासाठी सापडलेला मोबाईल अनब्लॉक आणि सेकंड हॅन्ड फोन बद्दल अधिक तपशील शोधण्यासाठीही वेबसाईट वापरू शकता. तथापि वेबसाईटवर तक्रारी देण्या अगोदर प्रथम स्थानिक पोलीस स्थानकात FIR नोंदवणे हे गरजेचे असते.
के वाय एम (नो युवर मोबाईल) नावाचे ॲप आता विनामूल्य ANDRID आणि IOS वर आणले आहे.जे तुमच्या मोबाईल निर्मात्याचे नाव मॉडेल क्रमांक आणि डिव्हाईस प्रकार यासारखे तपशील देत, तुमच्याकडे फक्त IMEI नंबर आणि ओटीपी प्राप्त करू शकणारा फोन नंबर असणे आवश्यक आहे.