उन्हापासून संरक्षणासाठी काय कराल ? आपण अवलंबल्या पाहिजे काही टिप्स ! वाचा सविस्तर

   


            नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखांमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो आपणाला माहीतच आहे की ,आता कडक उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे उन्हामध्ये जाताना किंवा या वातावरणामध्ये वावरत असताना आपल्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होऊ नये,म्हणून आपल्याला कोणकोणत्या काळजी या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घ्यावी लागेल. याबद्दल आपण KJMEDIA या लेखांमध्ये माहिती घेणार आहोत.आपण या दिवसांमध्ये आपले लाईफ स्टाईल किंवा आपले खानपान,राहणीमान कसे असावे याबद्दल थोडक्यात टिप्स देणार आहोत.त्या टिप्स आपण पूर्ण केल्या तर  या कडक उन्हापासून आपल्या शरीराचे संरक्षण होणार आहे. चला तर मग आपण बघूया कोणकोणत्या टिप्स आहेत ज्या आपण या दिवसांमध्ये अवलंबल्या पाहिजे.

सर्वात महत्त्वाची टिप्स

उन्हाळ्यातील सर्वात महत्त्वाची आणि पहिली टीप म्हणजे उन्हात बाहेर जाताना सुरक्षिततेची संपूर्ण काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत उन्हामध्ये जाण्याचे आपण टाळले पाहिजे. जर आपणाला बाहेर जायचे असेल तर, तुमचे शरीर पूर्णपणे झाकून ठेवून मगच बाहेर पडावे किंवा एखादी टोपी किंवा चष्मा उन्हापासून वाचवण्याचे एखादे क्रीम आपण लावूनच बाहेर पडावे.

अधिक पेये प्या. . 

  उन्हाळ्यात इतर काही खाद्य पदार्थ ऐवजी थंड पाणी, लिंबू पाणी ,लिंबू शिकांजी, सरबत कैरी ,फळांचा रस,ताक लस्सी यासारखी द्रव्य पेय आपण प्यायला पाहिजे. यामुळे आपले शरीराचे तापमान थंड राहण्यास मदत होते व आपल्या शरीराची ऊर्जा पातळी वाढते.

थंड प्रभाव असलेले पदार्थ खाणे...

उष्णतेचे दुष्परिणाम टाळण्यासाठी थंड प्रभावाचे पदार्थ खाण्याला आपण प्राधान्य दिले पाहिजे. यामध्ये तेल सरबत, आवळा, कच्चा कांदा,याचा आहारात समावेश केला पाहिजे,अण्ण पदार्थ गरम थंडीच्या आधारावर नव्हे तर, त्याच्या प्रभावाच्या आधारावर ओळखा जसे की आईस्क्रीम,कोल्ड्रिंक, बर्फाचा गोळा थंड असतानाही शरीरातील उष्ण वाढतात.

हलक्या रंगाचे कपडे घाला

उन्हाळ्यात थंड राहण्यासाठी हलक्या रंगाची कपडे वापरावेत. हलके रंग डोळ्यांना थंडावा देतात या अर्थात कॉटन, शिफॉन,जॉर्जेट क्रेप,असे पातळ आणि हलके कपडे घाला ज्यात हवा सहज जाऊ शकेल.

ताजे आणि पचायला सोपे असे अन्य खावे

उन्हाळ्यामध्ये हलके आणि ताजे आणि लवकर पचनारे अन्न आपण खाल्ले पाहिजे.भुकेपेक्षा कमी खा.आणि पाणी जास्त प्या.टरबूज, आंबा, संत्री,द्राक्षे,खरबूज इत्यादी रसाळ फळामुळे पोट भरते आणि शहरातील पाण्याची गरज ही पूर्ण होते.


शारीरिक श्रम कमी करा

उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात शारीरिक श्रम केल्यामुळे जास्त प्रमाणात पाणी आणि खनिजे घामाच्या रूपाने बाहेर पडतात.त्यामुळे शरीर अशक्त होण्यास मदत होते. त्यामुळे शरीरात पाणी आणि खनिज पदार्थांची कमतरता निर्माण न  होऊ देण्यासाठी अशा परिस्थितीत शरीरावर त्याचा परिणाम होतो.त्यामुळे शारीरिक श्रम कमी करण्यावर प्राधान्य द्या. किंवा शारीरिक श्रम हे संध्याकाळ व सकाळच्या वेळेस करावे. दुपारच्या वेळेस जास्त प्रमाणात शारीरिक श्रम करू नये.

पुरेशी झोप घ्या

उन्हाळ्यात झोप पुरेशी होत नाही. त्यामुळे थकवा लवकर येतो. ज्यामुळे अनावश्यक चिडचिड वाढते. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपणाला विश्रांतीची गरज भासते तेव्हा तेव्हा आपण विश्रांती घेतली पाहिजे.

व्यायामाकडे लक्ष द्या

उष्मा आणि आद्रतेमध्ये थोडासा व्यायाम केल्याने थकवा येऊ शकतो. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण संपूर्ण व्यायाम करणे सोडून द्यायचा. त्यामुळे हलका हलका व्यायामाचा आपण अवलंब केला पाहिजे.ध्यान धारणा, योगासने, प्राणायाम किंवा व्यायाम सकाळ संध्याकाळ चालण्याने ही होतो 

निसर्ग दाखवून थंडावा घ्या

सकाळी लवकर उठून आणि संध्याकाळी चालत निसर्गातील थंडावा अनुभवा झाडांना पाणी द्या. हिरवा गवतावर अनवाणी पायाने चालत जा.रंगीबिरंगी फुलांकडे टक लावून पहा. शुद्ध आणि मोकळ्या हवेचा दीर्घ श्वास घ्या.याशिवाय उन्हाळ्यात नैसर्गिक ठिकाणी फिरायला जा

चेहरा धुणे

उन्हात कुठे बाहेर जाताना थंड पेय पिऊन जा घरी आल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा किंवा त्वचेवर बर्फ आणि मसाज करा त्यामुळे तुम्हाला ताली तवाने वाटेल व उन्हाने आपले त्वचेला वाचवता येईल.



टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने