नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो आता लवकरच महिनाभरामध्ये उन्हाळा संपणार आहे . उन्हाळा संपला म्हणजे आपल्या शेतकरी राजाची कामे चालू होणार आहे. त्यामध्ये खते घेणे,बी बियाणे कोणते निवडावे, शेतामध्ये काय लावावे,ह्या बाबतीत सध्या शेतकरी विचाराधीन आहे.व या प्रकारची कामे आता शेतकरी करत आहे.परंतु अशा गोष्टी करत असताना शेतकरी जेव्हा बी बियांची खरेदी करतो. त्यावेळेस हे बी बियाणे खरेदी करत असताना त्याची फसगत होऊ नये. म्हणून शासन स्तरावर शासन काही पावले उचलत असतात.
यामध्ये शासन हे औषधे व बी बियाणे विक्रेत्यांवर काही बंधने आणून त्यांना शेतकऱ्यांची फसवणूक न होऊ देण्याचे ताकीद देऊन ती औषधे विकण्यासाठी परवानगी देत असतात.आता यामध्येच एक बियाणे म्हणजे कापूस म्हणजेच सरकी.हे बियाणे शेतकरी घेत असतो.आणि त्याची लागवड पाऊस येण्या अगोदर म्हणजेच 1 जून च्या अगोदर काही शेतकरी लावत असतात.म्हणजेच एक जून च्या अगोदर याची पेरणी झालेली असते. परंतु ह्या लागवडीने त्या कापसाच्या झाडांवर अनेक प्रकारांच्या रोगांचा प्रादुर्भाव शासनाच्या निदर्शनास आढळून आला आहे. परंतु नंतर पेरणी झालेल्या इतर कोवळ्या झाडांवर ही हा रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे. यामधीलच एक रोगाचे रूप म्हणजे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होत असून, त्यामुळे नंतरच्या लागवडीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. म्हणून शासनाने आता सरकी विक्रेत्यांना एक सूचना केली आहे.
यामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक 1 जून नंतरच कपाशीचे बियाणे विकण्याच्या सूचना कृषी विभागाच्या निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रक विभागाने बियाणे विक्रेते कंपन्या व होलसेल विक्रेते व छोटी दुकाने यांना दिल्या आहेत .सूचनेचे उल्लंघन झाल्यास विक्रेत्यांवर थेट कडक कारवाई केली जाणार आहे .यात होलसेल आणि चिल्लर विक्रेत्यांचा परवाना सुद्धा रद्द होणार आहे.
मान्सून पूर्व कापसाची लागवड केल्यास उत्पादन वाढते.असे शेतकऱ्यांचा अभ्यास आहे. यामुळे यातून कापूस उत्पादक पट्ट्यात मान्सूनपूर्व लागवड जास्त प्रमाणात वाढली आहे.याचा दुष्परिणाम असा झाला की गुलाबी बोंड अळीचा प्रकोप जास्त प्रमाणात वाढला आहे. हेच बोंड आळी चे चक्र थांबवण्यासाठी मान्सूनपूर्व कपाशी लागवड थांबवण्याच्या सूचना शासनाने शेतकऱ्यांना केल्या आहेत. त्यासाठी 1 जून नंतरची लागवड उपयोगी पडणारी आहे.
निविष्ठा व गुण नियंत्रण अधिकारी विकास पाटील यांनी राज्यातील विक्रेत्यांसाठी व्हीसी च्या माध्यमातून कृषी विभागाला सूचना दिल्या आहेत.
कशाप्रकारे आहेत विक्री बाबत सूचना
कंपनीकडून उत्पादित कपाशी बियाणे 10 मे पासून वितरकांना सपोर्ट होणार आहे.
वितरक हे बियाणे 15 मे नंतर किरकोळ विक्रेत्यांना विकणार आहेत.
किरकोळ विक्रेते हे एक जून नंतरच देण्याची विक्री शेतकऱ्यांना करणार आहेत.
बातमी सौजन्य दैनिक ई लोकमत