डिजिटल हेल्थ आयडी कार्ड (ABHA) बनवण्याचे मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आव्हान ! वाचा सविस्तर

 


 नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन लेखांमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो निरोगी व स्वस्थ जीवनासाठी आपले आरोग्य किती महत्त्वाचे आहे.आज गायत जगताना आपण जे खातो. त्या खाण्यामधील आणि दगदगीच्या व धावपळीच्या या जीवनात जगताना आपल्याला आरोग्याच्या बाबतीत अनेक समस्या उद्भवत असतात.अनेक आजार आपल्याला होत असतात. यामध्ये काही आजार हे फार गंभीर असतात. त्यामुळे या आजारांचे उपचार घेणे खूप महागडे असतात. त्यामुळे या आजारांचे उपचारांचा खर्च आपल्याला परवडणारा नसतो. .त्यामुळे आता भारत सरकार आयुष्यमान भारत चा एक भाग म्हणून डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकांसाठी युनिक हेल्थ कार्ड (ABHA)बनवत आहे. म्हणजेच आभा कार्ड बनवत आहे. पण यासाठी आपणाला त्यामध्ये नोंदणी करायची आहे.


        भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र भाई मोदी यांची संकल्पनेतून डिजिटल इंडिया ची सुरुवात झाली आयुष्यमान भारत डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत आयुष्यमान भारत योजनेचा एक भाग म्हणून भारत सरकार देशातील प्रत्येक नागरिकाचे युनिक हेल्थ आयडी म्हणजेच (ABHA) कार्ड बनवत आहे. आभा कार्ड हे प्रत्येक नागरिकांसाठी आवश्यक आहे. म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा सर्व नागरिकांना हे कार्ड बनवण्याचे आव्हान केले आहे.

मुख्यमंत्र्यांचे आव्हान व्हिडिओमध्ये बघा👇

 https://twitter.com/i/status/1574261427967209472

                      आभा या हेल्थ कार्ड म्हणून च्या मदतीने आपल्याला देशभरामध्ये कुठेही उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होईल. या कार्डवर सुद्धा आधार सारखा एक 14 अंकी नंबर मिळेल. या कार्डमुळे देशभरातील सर्व डॉक्टरांना आपल्या आतापर्यंत घेतलेल्या उपचारांचा अपडेट मिळेल व ते योग्य ते उपचार करू  शकतील.या कार्डचा उपयोग घेण्यासाठी आपल्याला या कार्डसाठी नोंदणी करावी लागेल ही नोंदणी कुठे करायची कशी करायची. व त्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतील याची सर्व माहिती आम्ही खालील प्रमाण


आबा कार्ड नोंदणी कशी करावी
★सर्वप्रथम healthid.ndhm.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
★मेनूमधून (आयुष्मान भारत आरोग्य खाते) डिजिटल हेल्थ कार्ड क्रिएट अकाऊंट निवडा. 
★ डिजिटल हेल्थ कार्डसाठी नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सवर क्लिक करावे
★नाव, पत्ता, फोन नंबर, प्राप्त झालेला OTP आणि इतर आवश्यक माहिती व्यवस्थित भरा.
★ अशा प्रकारे तुम्ही 14 अंकी डिजिटल हेल्थ कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
★ ABHA कार्ड साठी नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र खालील प्रमाणे
आधार कार्ड,जन्म प्रमाणपत्र आणि पॅन कार्ड .डिजिटल हेल्थ कार्डसाठी नोंदणी करण्यासाठी पॅन कार्ड देखील वापरले जाऊ शकते. नोंदणीसाठी वैध ड्रायव्हिंग परवाना ही आपण देऊ शकतो.


टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने