नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन लेखांमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जीवन जगत असताना आपल्याला एक शासकीय ओळख मिळावी म्हणून आधार कार्ड,मतदान कार्ड,पॅन कार्ड आणि पासपोर्ट या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास या सर्व महत्वपूर्ण दस्ताऐवजांचा कुणाकडून दुरुपयोग होऊ नये. म्हणून आपण यांचे काय केले पाहिजे चला तर मग जाणून घेऊया.
आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड व पासपोर्ट हे सरकारी क्षेत्र आणि प्रायव्हेट क्षेत्र मध्ये किती महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, हे तर आपणाला माहीतच आहे. कोणतेही काम करण्यासाठी या ओळख पुराव्यांची फार गरज पडते. त्यामुळे या कागदांना एखाद्या व्यक्तीसाठी खूप महत्त्व आहे. काही वेळेस व्यक्तीचे मृत्यू झाल्यास त्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड आणि पासपोर्ट हे जर कोणाच्या हाती पडल्यास याचा दुरुपयोग होऊ शकतो. म्हणून आपण खबरदारी घेतली पाहिजे की हे कुणाच्या हाती लागू नये. हे जे कार्ड ज्या विभागातून बनवण्यात आले आहे. त्या विभागाला आपण सूचित केले पाहिजे की या व्यक्तीचे मृत्यू झाला आहे त्यामुळे त्या कार्डांचा कोणीही गैरवापर घेऊ शकणार नाही.
आधार कार्ड
सहसा आपण पाहतो की आधार कार्ड च्या माहिती चा खूप ठिकाणी चोरी होऊन दुरुपयोग होत असतो. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या संबंधित नातेवाईकांनी त्याचे आधार कार्ड चा दुरुपयोग न होऊ देणे, ही त्यांनी काळजी घेतली पाहिजे. UIDAI या आधार विभागाजवळ आधार कार्ड बंद करण्यासाठी आथराईज नाही. परंतु आपण मृत्यू झालेल्या व्यक्तीची एखादी सरकारी योजना चालू असेल, तर त्याला हे आधार लिंक केलेलेच असेल ,त्यामुळे UIDAI या वेबसाईटवरून त्या कार्डाची माहिती घेऊन त्याला ब्लॉक केले जाऊ शकते जेणेकरून त्या कार्डाचा दुरुपयोग थांबू शकतो.
पॅन कार्ड
इन्कम टॅक्स भरण्यासाठी आणि अनेक फायनान्शिअल सुविधांसाठी पॅन कार्डचा उपयोग होतो.आपल्या अनेक बँक आणि अनेक अकाउंटला पॅन कार्ड हे लिंक केलेले असते. एखाद्या व्यक्तीचे मृत्यू झाल्यास आपण पॅन कार्ड हे त्यावेळी पॅन कार्ड विभागाच्या स्वाधीन केले पाहिजे परंतु त्यापूर्वी आपण त्या व्यक्तीचे सर्व अकाउंट बंद झालेले असल्याचे सहनिशा करून घेतली पाहिजे. तरच ते त्या विभागाला देऊ केली पाहिजे.
मतदान कार्ड
मतदान कार्ड आपल्याला माहीतच आहे.की मतदान करण्यासाठी ते उपयोगात पडते परंतु एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे मतदान रद्द करण्यासाठी आपल्याला त्या विभागाशी संपर्क साधून फॉर्म-7 हा भरून द्यावा लागतो. आणि त्यामुळे त्याचे मतदान कार्ड हे रद्द होते.परंतु हे मतदान कार्ड रद्द करण्यासाठी त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र द्यावे लागते.
पासपोर्ट
पासपोर्ट अॅक्ट नुसार एखाद्या पासपोर्ट जेव्हा तयार होतो त्याला परत रद्द केले जाऊ शकत नाही. परंतु त्याची एक्सपायरी तारीख असते. जेव्हा एखादा व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या परिजनांनी त्याचे पासपोर्ट हे सुरक्षित आपल्याजवळ ठेवून घेतले पाहिजे .काही काळानंतर त्या पासपोर्टची एक्सपायरी डेट संपल्यानंतर त्याचा गैरवापर करू शकणार नाही .तेव्हा मित्रांनो आपणाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा धन्यवाद.