![]() |
Photo credit - pixabay.com |
नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या या नवीन लेखांमध्ये आपले स्वागत आहे .आज जगामध्ये प्रत्येकाजवळ मोबाईल फोन व स्मार्टफोन आलेला आहे परंतु यामधील नेटवर्क येण्यासाठी जे सिम कार्ड आपण वापर करतो. त्या सिम कार्ड बद्दल आपल्याला माहिती आहे. चला तर मग जाणून घेऊया सिम कार्डच्या थोडक्यात इतिहासाबद्दल.
मित्रांनो एक काळ असा होत जेव्हा नवीन टेलिफोन ची निर्मिती झाली होती. मोबाईल फोन किंवा लँडलाईन मध्ये सिम कार्ड टाकले जात नव्हते कारण आधीपासूनच टेलिफोन मध्ये नेटवर्क येण्यासाठी मोबाईल सिम कार्ड टाकायची गरज नव्हती, कारण हे टेलिफोन पोस्टपेड होते. यासाठी घरपोच नेटवर्कची वायरिंग करावे लागत असत. बिल ही घरपोच येत असत .त्यानंतर काळाच्या ओघात हे मांगे पडत गेले आणि मोबाईल फोन व स्मार्टफोन उदयास आले. त्यामुळे यामध्ये नेटवर्क येण्यासाठी सिम कार्डची निर्मिती झाली, परंतु प्रथम सिम कार्ड हे आयताकृती होते सिम कार्ड हे आयाताकृती असल्यामुळे त्या काळात मोबाईल मध्ये टाकत असताना वापरकर्त्यांना खूप अडचणी यायच्या, कधी हे सिमकार्ड उलटे टाकले जायचे किंवा हे सिम कार्ड टाकत असताना ते सिमकार्ड ट्रे मध्ये फसून जायचे आणि काढल्यानंतर सिम कार्ड ची चीप कधी कधी खराब होऊन जायची . अशा अडचणीमुळे कंपनीने यामध्ये नंतर बदल करून या सिमला एका बाजूला कट देण्यात आला. आणि त्याच पद्धतीने मोबाईल मध्येही सिम कार्ड टाकण्याच्या ट्रे ला सुद्धा हाच आकार देण्यात आला. त्यामुळे सिम टाकत असताना मोबाईल वापरकर्त्यांना हे सोपे जाऊ लागले.आता वर्तमानात यामध्ये छोट्या आकारात ही आता सिम बनू लागले आहे.ज्याला आपण नॅनो सिम म्हणतो. हा कट एवढा फेमस झाला की जगातील सर्व मोबाईल कंपन्यांनी हाच फॉर्मुला वापरला या फार्मूल्याला ISO हे मानांकनही प्राप्त झाले.
मोबाईल सिम बनवणारी 'आयडिमिया' ही कंपनी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे ही कंपनी संपूर्ण जगामध्ये आपले सिम कार्ड सर्व देशांतील मोबाईल नेटवर्क कंपन्यांना पूरवत असते .ही कंपनी भारताला आपले हब सेंटर बनवत आहे.ही कंपनी सिम कार्ड च्या विस्तारीकरणासाठी भारतामध्ये प्रयत्नशील आहे. मित्रांनो आपणाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद.