नवरात्र उत्सवाचे हे महत्त्व आपणाला माहित आहे काय ? चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती

                 



                                Photo credit-pixabay.com
    

              नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या या नवीन लेखांमध्ये आपले स्वागत आहे. आजपासून नवरात्री उत्सव सुरू होणार आहे .नवरात्री उत्सव म्हणलं की नऊ दिवस देवीची पूजा ,दांडिया, गरबा व असे अनेक उत्सवाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते परंतु हे नऊ दिवस देवीला आपण का स्थापन करतो.देवीची आराधना का केली जाते. याचेही एक महत्त्व आहे.आणि या महत्त्वाची  नऊ दिवसाची एक कथा सुद्धा आहे चला तर मग जाणून घेऊया.

       ती कथा अशी आहे की, महिषासुर नामक एक शक्तिशाली भयानक राक्षस होता.ज्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले.तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला वर मागण्यास सांगितले, तेव्हा  त्यांने ब्रह्मदेवाला अमर होण्याचा वर मागितला परंतु ब्रह्मदेव म्हणाले,"या जगामध्ये  जो जीव जन्माला आला आहे, त्याला मृत्यू ही  येणारच त्यामुळे जीवन मरणा व्यतिरिक्त  तू दुसरा वर मांग" हे ऐकून मग महिषासुर असा म्हणाल की "देवा मला मग असा वर दे की  मला देव ,राक्षस आणि मनुष्याकडून  मरण येणार नाही,तर मला मारणारी एक स्त्री असेल" तेव्हा ब्रह्मदेव तथास्तु म्हणून अदृश्य झाले.

                    यानंतर महिषासुर राक्षसांचा राजा झाला. आणि त्याने देवांवर आक्रमणे केली परंतु देवही एकजूट होऊन त्याच्या विरुद्ध लढा देऊ लागले. यामध्ये महादेव शंकर आणि भगवान  विष्णू यांनीही देवांना मदत केली परंतु प्रत्येक वेळी देवांची हार होत गेली. तेव्हापासून महिषासुर हा देव लोकांवरही राज करू लागला.  देवांच्या रक्षणासाठी सर्व देव भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णू आणि आदिमाया यांचेकडे त्यांनी प्रार्थना केली या प्रार्थनेतून त्या सर्वांची अंगातून एक तेजस्वी प्रकाश बाहेर आला आणि या प्रकाशातून एक सुंदर अशी देवी म्हणजे दुर्गा मातेने रूप धारण केले. ती एवढी सुंदर होती की तिच्यावर महिषासुर मोहित झाला.आणि तिला लग्न करण्यासाठी त्याने प्रस्ताव मांडला. व परत परत देवीला लग्नासाठी विनवण्या करू लागला.

अखेर दुर्गा देवी मान्य झाल्या परंतु त्यांनी एक अट ठेवली त्या म्हणाल्या की"महिषासुरा तुला जर माझ्यासोबत लग्न करायचे असेल तर तुला माझ्यासोबत लढाईमध्ये जिंकावे लागेल" तेव्हा महिषासुराने ही गोष्ट मान्य केली आणि  दुर्गा देवी व महिषासुर यांच्यामध्ये नऊ दिवस लढाई झाली. आणि या लढाईत नवव्या दिवशी महिषासुरचा देवीने वध केला. यामुळे देवीला महिषासुर मर्दिनी असेही म्हणतात. अशाप्रकारे  नऊ दिवसाची ही कहाणी सांगण्यात येते तेव्हा मित्रांनो आपणास हा लेख कसा वाटला कॉमेंट करून जरूर कळवा धन्यवाद.

सूचना:- वरील लेख सामान्य माहिती ,ग्रंथ परंपरा आणि पौराणिक कथा यांच्या मान्यतेवर आधारित आहे याची KJMEDIA पुष्टी करत नाही.  


टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने