5g सेवेचे आजपासून होणार भारतामध्ये अधिकारीक उद्घाटन ! प्रथम कोणकोणत्या शहरात येणार 5g सेवा ? वाचा सविस्तर

  

                                Photo credit-pixabay.com

  नमस्कार मित्रांनो की KJMEDIA च्या नवीन लेखांमध्ये आपले स्वागत आहे.आज मोबाईल क्षेत्रामध्ये नवनवीन क्रांती घडून येत आहे. यामध्ये आपण 2g,3g,4g, नेटवर्कमध्ये इंटरनेटचा वापर केलेला आहे. परंतु आता आजपासून म्हणजेच 1 आक्टोंबर 2022 रोजी पासून 5g  हे नवीन नेटवर्क मोबाईल कंपन्यांमध्ये आपल्याला भेटणार आहे. औपचारिक व अधिकारीक उद्घाटन 5g चे आज  होणार आहे.

     आज नवी दिल्ली येथे इंडिया मोबाईल काँग्रेस(IMC) 2022 मध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5g नेटवर्कचे अधिकारीक उद्घाटन होणार आहे. 5g नेटवर्क सुरू होण्यामागे फक्त काही तासांचा अवधी आता उरला आहे. या कार्यक्रमांमध्ये तीन सर्विस प्रोव्हायडर कंपनी आहेत. यामध्ये एक म्हणजे जिओ दुसरी म्हणजे वोडाफोन आयडिया (VI) आणि तिसरी म्हणजे एअरटेल. भारतामध्ये 5g  नेटवर्क सुरू होत असताना या सर्व कंपन्या काही नेटवर्कचे काही डेमो पण दाखवणार आहेत.  5g हे एक मोबाईल नेटवर्क नसून त्याही पेक्षा भरपूर काही आहे. 5g हे असे नेटवर्क आहे की जे वायरलेस नेटवर्क करू शकत नव्हते ते आता 5g मुळे साध्य होणार आहे.

स्पेक्ट्रम नीलामी मध्ये प्रामुख्याने चार कंपन्यांचा होता सहभाग

                स्पेक्ट्रम नीलामी मध्ये प्रामुख्याने चार कंपन्यांचा सहभाग होता. यामध्ये वडाफोन आयडिया म्हणजेच (VI) जिओ, एअरटेल आणि अदानी कंपनी यांचा समावेश होता. या नीलामी मध्ये दूरसंचार विभाग म्हणजेच ( DOT ) ला 1.50 लाख करोड रुपये या नीलामी मध्ये मिळाले.आहेत आता 5g हे नेटवर्क कोणकोणत्या शहरात सर्वप्रथम चालू होणार आहे ते बघूया पुढील प्रमाणे.

प्रथम कोण कोणत्या शहरात सुरू होणार 5g

      5g नेटवर्कचे प्रथम परीक्षण  या 13 प्रमुख शहरांमध्ये होणार आहेत. अहमदाबाद, बेंगलोरु,चंदीगड,चेन्नई,दिल्ली गांधीनगर,गुरुग्राम,हैदराबाद,जामनगर,लखनऊ,मुंबई आणि पुणे या शहरात होणार आहे.दिल्ली,मुंबई कोलकत्ता आणि चेन्नई या शहरामधून जिओ प्रथम सेवा देणार आहे.

संपूर्ण देशामध्ये केव्हापर्यंत मिळेल 5g सेवा

                     तथाकथित रिलायन्स जिओनी सर्वात जास्त गतीने जगामध्ये 5g सेवा देण्याचा मानस केला आहे. त्यांच्या मते 2023 पर्यंत संपूर्ण भारतात 5g सेवा देण्याचा प्रयत्न आहे. तर एरटेल भारती चा 2024 पर्यंत संपूर्ण देशात 5g सेवा देण्याचा प्रयत्न आहे. वोडाफोन आयडिया म्हणजेच(VI) या कंपनीने ग्राहकाच्या मागणीनुसार फाय जी सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे.

4 g च्या तुलनेत 5g ची किती असेल गती

सध्या देशामध्ये 100 मिलियन पेक्षा जास्त उपयोग करता 5g स्मार्टफोन ने रेडी  आहेत. 5g ही नेटवर्क सेवा सध्याच्या 4g सेवेपेक्षा दहा पट जास्त नेटवर्क ला गती देईल.

5g सेवेचा कोणत्या क्षेत्रांना होणार फायदा 

वेअर हाऊसिंग ,टेली मेडिसिन व मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रांना याचा फायदा होणार आहे. 5g नेटवर्कची  उपयोगिता ही शैक्षणिक क्षेत्रात ही खूप फायदा देणारी आहे. यामुळे वर्चुअल जग अगदी सोपे होईल .यामध्ये आणखी 5g व्हिडिओग्राफी मुळे आपण आपदाग्रस्त क्षेत्रामध्ये व ड्रोन द्वारे शेती क्षेत्रात याचा फायदा होईल तर मित्रांनो आपणाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आमच्या वेबसाईटला फॉलो करा.


                                         बातमी सौजन्य-: हिं हिंदुस्तान हिंदी

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने