लंपी आजाराने पशुधनाचा (जनावरांचा)मृत्यू झाल्यास महाराष्ट्र सरकारकडून पशुपालकांना मिळणार नुकसान भरपाई वाचा सविस्तर

   नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन बातमी लेखा मध्ये आपले स्वागत आहे . मित्रांनो आज आपण संपूर्ण महाराष्ट्रात बघतोय की लंपि आजाराने शेतकऱ्यांच्या पशुधनाला म्हणजेच जनावरांना हा रोगाणे  ग्रासले आहे. त्यामुळे शासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर लस देण्याचा उपक्रम चालू आहे. परंतु तरीही हे होत असताना एखाद्या शेतकऱ्याचे गुरे या रोगामुळे दगावल्यास महाराष्ट्र शासनातर्फे त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे. तेव्हा खालील प्रमाणे आम्हीही आपणास माहिती देत आहोत.



    नुकसान भरपाईच्या निकषांमधून अल्प आणि अत्यल्प भूधारक हा निकष शिथील करण्यात आला असून, आता लम्पी चर्मरोगाने बाधित पशुधनाचा (जनावराचा) मृत्यू झाल्यास अशा सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर करण्यात आल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले आहे.

दोन निर्णय घेण्यात आले

        श्री. सिंह म्हणाले, पशुसंवर्धन विभागाचे लम्पी रोगाविषयी महत्त्वाचे दोन निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये पहिला निर्णय म्हणजे नुकसान भरपाईच्या निकषांमधून अल्प आणि अत्यल्प भूधारक हा निकष शिथील करण्यात आला आहे. असून, आता लम्पी बाधित पशुधनाचा मृत्यू झाल्यास अशा सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

      दुसरा निर्णय पशुपालकांना यापूर्वी लम्पीमुळे मृत्युमुखी पडलेल्या जास्तीत जास्त ३ जनावरांसाठी हा लाभ देण्याचा मानस होता. परंतु आता ही अट शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे लम्पीमुळे मृत्युमुखी पडलेल्या सर्व पशुधनाकरीता त्यांच्या पशुपालकांना नुकसान भरपाई मिळणार आहे. या संदर्भातील आवश्यक पत्र शासन स्तरावरून निर्गमीत झाले असून अनुषंगिक शासन निर्णय लवकरच जारी होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

            श्री. सिंह म्हणाले, लम्पी आजाराच्या विषाणूच्या जनुकीय परिक्षणांतर्गत जिनोम क्रमवारीता तपासणीसाठी आवश्यक नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे (National Institute of Virology (NIV) येथे पाठविण्यात आले आहेत. या तपासणीमुळे विषाणूमधील जनुकीय स्तरावरील बदलांबाबतची माहिती प्राप्त होणार आहे, तसेच लसीमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक नमुने ७ विभागांमधून प्रतिविभाग दोन गावातील पशुधनातील लसीकरणापुर्वीचे नमुने व लसीकरणाकरणानंतरचे ७, १४, २१ व २८ दिवसांचे रक्तजल नमुने संकलित करुन ते बेंगलुरु येथील राष्ट्रीय रोगपरिस्थिती विज्ञान व रोगमाहिती संस्था (National Institute Of Veterinary Epidemiology And Disease Informatics (NIVEDI) येथे पाठविण्यात येत आहेत.

 शासनाचे आरोग्य प्रमाणपत्र व अटींच्या  अधीन राहून पशुधनाची वाहतूक करावी 

         शासन अधिसूचना दि. ३०.९.२०२२ अन्वये संक्रमित व संक्रमित नसलेल्या क्षेत्रातून आरोग्य प्रमाणपत्रासह म्हशींची वाहतुक करण्यासाठी काही अटींच्या अधीन राहून वाहतुक करण्यास परवानगी दिली असल्याचे श्री.  सिंह यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील अनेक गावात लागण परंतु उपचाराने बरी होत आहेत गुरे

राज्यामध्ये दि. ०७.१०.२०२२ अखेर ३२ जिल्ह्यांमधील एकूण २ हजार २६७ गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण ६३ हजार ०६४ बाधित पशुधनापैकी एकूण ३३ हजार ६७५ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे.  उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. 

लंम्पी लसीकरण हे मोफत आहे

        राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 128.01 लाख लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून एकूण 115.18 लाख पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले असून अकोला, जळगांव, कोल्हापूर, सांगली, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे 82.32 % गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने