Sewing machine yojna 2022 केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन.कोठे करावा अर्ज व कोणते कागदपत्रे लागतील वाचा सविस्तर

         


                      नमस्कार मित्रांनो KJ MEDIA च्या नवीन माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो केंद्र सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवत असते. यामध्ये ज्या महिला आर्थिक दृष्ट्या कमकुवत  आहेत. त्यांच्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार  त्यांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी योजना राबवत असतात. 

                 आता सध्या केंद्र सरकार महिलांसाठी एक योजना राबवत आहे. ती योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना 2022. म्हणजेच जवळपास  राज्यातील 50000 महिलांना मोफत शिलाई मशीन देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अशा महिलांनाचे अर्ज मागवले आहे.

     देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी यांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांसाठी अनेक योजना राबवत आहे. यामध्ये जेणेकरून आर्थिक दृष्ट्या दुर्बल व कष्टकरी महिलाना रोजगार मिळवून आपली उपजीविका भागू शकेल व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकेल. त्यामुळे केंद्र सरकार गरीब आणि कष्टकरी महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे.

           या योजनेचा लाभ ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत व दुर्बल कामगार महिलांना मिळणार आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. यामध्ये 20 ते 40 वर्षापर्यंत महिला अर्ज करू शकतात. 

या योजनेसाठी कोणते कागदपत्रे लागेल ते खालील प्रमाणे

*वय प्रमाणपत्र

*विधवा व निराधार असल्यास महिलेचे विधवा व निराधार प्रमाणपत्र

*अर्जदाराचे आधार कार्ड

*समुदाय प्रमाणपत्र

*मोबाईल नंबर

*उत्पन्न प्रमाणपत्र

*ओळखपत्र

*अपंग असल्यास अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र

*पासपोर्ट आकाराचा फोटो


एवढी कागदपत्रे घेऊन आपण त्या योजनेसाठी पात्र ठरू शकतात अर्ज करण्यासाठी  http://www.india.gov.in/ वेबसाईटवर जाऊन अर्ज करावेत. किंवा आपल्या जवळील कॉमन सर्विस सेंटर (csc) ला भेट द्यावी.आपण या सर्व गोष्टीत पात्र असला तरच आपण अर्ज करावा नसता अर्ज करू नये कारण आपला अर्ज मान्य होणार नाही धन्यवाद


टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने