शेतकऱ्याला ही मिळते मोफत अपघाती विमा संरक्षण ! कोणती आहे योजना ? कोण कोणती लागतात कागदपत्रे ? वाचा सविस्तर !

   


          नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखांमध्ये आपले स्वागत आहे.मित्रांनो आपणास माहीतच आहे की  शासकीय कर्मचारी ड्युटीवर असताना त्याचा  अपघातात मृत्यू झाल्यास किंवा त्याला अपंगत्व आल्यास त्याला विमा स्वरूपी काही भरपाई रक्कम मिळते. त्यामुळे त्याच्या परिवारास काही अर्थसहाय्य मिळते व या दुःखातून सावरण्यास साठी मदत होते. याच अनुषंगाने शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जातो. शेतकरी जगला तर सर्व जग जगेल म्हणून याच धरतीवर शेतकऱ्यांना जर शेतामध्ये काम करताना मृत्यू आल्यास किंवा अपघातात अपंगत्व आल्यास विमा मिळतो काय ? तर याचे उत्तर आहे होय !कारण राज्य सरकारमध्ये यासाठी तरतूद आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया.

          महाराष्ट्र राज्य सरकारकडून एक विमा योजना राबवली जाते. जी म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात बीमा योजना. ज्या मधून शेतकऱ्याला अपघात झाल्यानंतर मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास बीमास्वरूपी  रक्कम त्याच्या परिवारास मिळते.राज्य सरकारच्या धरतीवर ही योजना राबवली जाते. या योजनेसाठी आपल्याला कोणकोणत्या अटी व नियम मध्ये बसावे लागते व या योजना कोणकोणत्या अपघातावर मिळतात,हे आपण सविस्तर जाणून घेऊया.आणि यासाठी कशाप्रकारे आपल्याला अर्ज करावा लागतो किंवा क्लेम करावा लागतो हे जाणून घेऊया.

कोण कोणत्या अगोदर साठी ही मदत होते. 

  1. वीज पडून इलेक्ट्रॉनिक शॉप नी मृत्यू
  2. सर्पदंश विंचू दंशातून विषबाधा
  3. पाण्यात बुडून झालेला मृत्यू
  4. उंचावरून  पडून झालेल्या मृत्यू
  5. रस्ते अपघात व रेल्वे अपघातात मृत्यू
  6. जनावरांचा हल्ला व चाव्याने मृत्यू 

   *मदत कशाप्रकारे व किती होते

शेती करीत असताना जर अपघात झाला आणि मृत्यू आल्यास तसेच अपघातामुळे दोन्ही डोळे अथवा  दोन्ही हात किंवा दोन्ही पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये पर्यंत विमा रक्कम मिळते.

एक डोळा किंवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास म्हणजेच अपंगत्व आल्यास एक लाख रुपयाचे अनुदान शेतकऱ्यास मिळते.

शेती करणार्‍या व्यक्तीचे सातबारावर नाव नसल्यास तरीही मिळणार रक्कम 

या योजनेच्या अनुषंगाने सातबारावर जर संबंधित शेतकऱ्याचे नाव सातबारावर नसेल  किंवा  परंतु तो शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्य असेल व तो शेतकऱ्याचा पुढील वारसदार असेल . जर त्याचाअपघात झाला किंवा अपंगत्व  आल्यास त्याला वरील प्रमाणेच लाभ देण्यात येतो. 2018- 2019 पासून या योजनेत शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला संरक्षण देण्यात आले आहे.


विमा क्लेम साठी कोण कोणती लागतात कागदपत्रे?

१)क्लेम फॉर्म भाग -1व सहपत्र

२)क्लेम फार्म भाग -2 (अ) व (ब)

३)फिल्म फॉर्म भाग-3

४)सातबारा उतारा,6- क (वारस नोंद उतारा)6- ड (फेरफार उतारा)

५)वयाचा पुरावा (स्वयंसाक्षांकित प्रत)

६)बँक पासबुक (झेरॉक्स प्रत)

७)शिधापत्रिका झेरॉक्स (स्वयंसाक्षांकित प्रत)

मृत्यू दाखला

८)अपंगत्व दाखला स्वयंसाक्षांकित

९)अपंगत्वाच्या टक्केवारीचे प्रमाणपत्र व फोटो

१०)प्रथम माहिती अहवाल (एफ आय आर) (साक्षांकित प्रत)

११)घटनास्थळ पंचनामा (स्वयंसाक्षांकित प्रत)

१२)पोलीस पाटील माहिती अहवाल (एफ आय आर नसल्यास)

 १३)शवविच्छेदन अहवाल

१४)व्हीसेरा अहवाल (आवश्यक असल्यास)

१५)वाहन परवाना (आवश्यक असल्यास)

१६)नावात /आडनावात बदल असल्यास प्रतिज्ञापत्र


                                    माहिती सौजन्य लोकमत इ पेपर







टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने