नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखन मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो सरकारी काम आले की आपणास लेखी अर्ज कागदपत्रे तक्रार अशा गोष्टी आल्याचकी,आपली काही शासकीय कामे जर आपल्याला हव्या असलेल्या वेळेत होत नसतील तर, किंवा शासकीय कर्मचारी हे आपल्या कामाला पुढे ढकलाढकल करत असतील तर आपले शासकीय काम न झाल्यास आपल्याला शेवटचा पर्याय उरतो तो तक्रार करणे.
परंतु तक्रार करणे हे खूप त्रासदायक असून त्यासाठी लेखी अर्ज करणे व तो त्या विभागामार्फत त्याला पोहोचवणे यामध्ये खूप वेळ खाऊपणा असल्याने तक्रार करणे नागरिकांना सहज वाटत नाही.त्यामुळे काही तक्रारदार हे तक्रारच करत नाही. किंवा या भानगडीत न पडलेले बरं असे म्हणून सोडून देतात. त्यामुळे कर्मचारी याचा फायदा उचलतात. म्हणून हे तक्रार अर्ज सहज रीतीने करता यावेत म्हणून नागरिकांना आता तक्रारी ऑनलाइन करावे लागणार आहेत.याकरिता मंत्रालयासह राज्यातील 36 जिल्ह्यात आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली विकसित करण्यात आली आहे.याद्वारे तक्रारी ऑनलाइन पद्धतीने घ्याव्यात असे आदेश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.
ऑनलाइन आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली विकसित
शासकीय कार्यालयात विविध प्रकारच्या तक्रारी दाखल होत असतात .काही तक्रारी लेखी स्वरूपात दिल्या जातात तर काही तक्रारी या टपालाद्वारे म्हणजेच पोस्ट ऑफिस ने पाठवल्या जातात. अशा काही तक्रारी निनावी स्वरूपाच्या असतात त्यामुळे त्यांची सहजा दखल घेता येत नाही काही रीतसर तक्रारीचे स्वरूपच मोघम असल्यामुळे, त्यामुळे कार्यवाहीचा प्रश्न उपस्थित होतो. लेखी स्वरूपात दाखल झालेल्या तक्रारींची प्रत्यक्ष दखल घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यापर्यंत प्रवास व वेळ खूप जास्त प्रमाणात जात असतो.तक्रार अर्जदाराला अर्जावर पोहोच पावती दिली जाते. मात्र अनेकदा नंतर या तक्रारी अर्जाचा शोध घेणे तक्रारदाराला अवघड होते.या सर्व पार्श्वभूमीवर तक्रारीचे जलद गतीने गतिकरण व्हावे. याकरिता राज्य शासनाने आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे.
लेखी स्वरूपातील तक्रारीची ऑनलाईन मध्ये रूपांतर होणार ..
ज्या कार्यालयाकडे लेखी अथवा टपालद्वारे तक्रार दाखल होतात,त्या कार्यालयात अशा तक्रारी दाखल झाल्या आहेत.त्या कार्यालयांना अशा लेखी तक्रारी संबंधित शासकीय प्रणालीत ऑनलाईन पद्धतीने समाविष्ट करून पुढे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आपण लेखी अथवा टपाल मार्फत जरी तक्रार दिली असेल तरी ती तक्रार पुढे ऑनलाईन स्वरूपातच रूपांतर होणार आहे.आणि पुढे ती ऑनलाईन पद्धतीनेच सोडण्याचा प्रयत्न जो तो विभाग करणार आहे.
संदेश येणार मोबाईल क्रमांकावर..
सक्षम पणे लेखी तक्रार दाखल करणाऱ्याचा मोबाईल क्रमांक तक्रारीवर लिहून घ्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत.तक्रारीवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तक्रार प्राप्त झाल्याचा संदेश दिला जाईल, त्या खेरीज त्या तक्रारदारच्या तक्रारीची सद्यस्थिती काय आहे,हे तक्रारदाराला क्षणात समजणार आहे.
ऑनलाइन तक्रार अर्जाने काय होणार
या प्रणालीमुळे तक्रारदार व संबंधित कार्यवाही करणाऱ्या यंत्रेचा वेळ वाचणार आहे. तक्रार अर्ज गहाळ होणे, सद्यस्थितीत तक्रार अर्ज कोणत्या टेबलावर आहे. हे न समजणे असे प्रकार होणार नाहीत. त्यामुळे हे तक्रार अर्ज ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येईल व भविष्यामध्ये संदर्भ म्हणून त्याचा वापर करण्यात येईल.