नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन मनोरंजक लेखांमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो आपण दक्षिणात्य चित्रपटांपैकी" पुष्पा ' हा सिनेमा पाहिलाच असेल आणि हा सिनेमा आपल्याला कितपत आवडला हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे आपण दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होतो.ती वाट पाहणे संपुष्टात आली आहे. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असून त्यामुळे पुष्पाचा पुन्हा रांगडा अभिनय आपणास अनुभवयास मिळणार आहे.
दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन ने आपल्या टेरर अँक्शनने संपूर्ण दाक्षिणात्य इंडस्ट्रीला झटका दिला आणि बॉलिवूडच्या मोठमोठ्या निर्मात्यांची बोलती बंद केली अशा पुष्पाला पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाने अक्षरशः प्रेक्षकांना वेड लावून प्रभावित केले. या चित्रपटांमध्ये अल्लू अर्जुनची हटके असलेली भूमिका पाहून तर चाहते त्याच्या प्रेमात पडलेच यात शंका नाही परंतु अल्लू अर्जुनचा कधीही न पाहिलेला अवतार आणि श्रीवल्लीच्या अदा पाहून प्रेक्षक प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटले व पैसा वसूल चित्रपट म्हणून हा उत्कृष्ट चित्रपट पाहायला मिळाला. पुष्पाचे एकापेक्षा एक दमदार डायलॉग आणि कडक फायटिंग सीन पाहून थिएटर फक्त टाळ्या आणि शिट्ट्यांनी गजबजलं होतं. आता हाच पुष्पा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येतो याची चाहते आतुरतेने वाट पाहत होतेच,तर आता फार वाट पाहावी लागणार नाहीये कारण पुष्पा परत येतोय 'पुष्पा २' चा पहिला पोस्टर प्रेक्षकांसमोर आला आहे.
अल्लू अर्जुनच्या अभिनयाने सजलेला 'पुष्पा २' म्हणजेच 'पुष्पा: द रुल' डिसेंबर महिन्यात धमाका करायला येऊ शकतो. पुन्हा एकदा अल्लू अर्जुनचा अभिनयाचा दबदबा यामुळे अनुभवायला मिळणार आहे. पुष्पाभाऊच्या आताच्या नव्या अवतारात नेमकं काय पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्कंठा आहे. चाहते पुढची कथा नेमकी काय असेल याचा अंदाज लावत असतानाच या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटात पुष्पा रक्तचंदनच्या लाकडाचा व्यवसाय करताना दाखवण्यात आला आहे. त्यामुळे पोस्टरमध्येही कापलेल्या झाडाचं खोड दिसत आहे. त्यावर पुष्पाची कुऱ्हाड दिसत आहे. एका बाजूला त्याची बंदूकही दिसत आहे. महत्वाचं म्हणजे या खोडावर पुष्पाची सावली आहे. त्याचं चित्र दिसत आहे. त्यात लिहिलंय, 'पुष्पा परत येतोय'.सोबतच चित्रपटाचे पुढचे पोस्टर आणि टीझर ८ एप्रिल पासून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.असंही लिहिलेलं आहे. त्यामुळे हे पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्साहाला आनंदाला आता पारेवार उरणार नाही. पुष्पाची दहशद पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. या नव्या पोस्टरची प्रचंड चर्चा आहे.