शेतकऱ्यांनो ! दोन दिवसात जमा करा आधार व पासबुक झेरॉक्स नसता अतिवृष्टीची नुकसान भरपाई पासून वंचित राहाल ! वाचा सविस्तर

  


               नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे. मागील खरीप हंगामात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई शासनातर्फे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी अद्याप पर्यंत आपले आधार कार्ड व बँकेचे पासबुक ची माहिती शासनापर्यंत पुरवलेली नाही त्यामुळे  अशा शेतकऱ्यांना शासनातर्फे मदत देण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाने ह्या शेतकऱ्यांना साठी दोन दिवसाची मुदत देण्यात आली आहे.या दोन दिवसात शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड व पासबुक चे झेरॉक्स हे कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन  करण्यात आलेले आहे.

                अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे.भोकरदन तालुक्यातील 65 हजार शेतकऱ्या पैकी 17000 शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 14 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही आठवड्याभरात ही रक्कम मिळणार आहे. 

तलाठी व कृषी सहाय्यक कडे द्यावी लागणार कागद पत्रे

           शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जाहीर केलेली भरपाईची रक्कम मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जलद गतीने जावी तसेच अनुदान वाटपात पारदर्शकता आणण्यासाठी हे अनुदान थेट शासनास स्तरावर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे.यासाठी नव्याने याद्या तयार करण्यात आल्या आहेत.भोकरदन तालुक्यातील 65 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे. त्यापैकी 50 हजार शेतकऱ्यांची माहिती भोकरदन तहसील कार्यालयातून शासनाला पाठवण्यात आली आहे. अद्यापही 15 हजार शेतकरी आधार कार्ड व पासबुकची झेरॉक्स जमा करू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांना अनुदान मिळण्यास अडचण येणार आहे. त्यामुळे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड व बँक पासबुकची प्रत तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा करण्याचे प्रशासना कडून आवाहन करण्यात  आले आहे.

सामायिक क्षेत्र असलेल्याना संमती पत्र देणे गरजेचे

ज्या शेतकऱ्यांचे सामाईक क्षेत्र आहे. त्यांना आधार कार्ड व बँक पासबुक बरोबरच सामायिक क्षेत्रामधील कोणत्या व्यक्तीच्या  खात्यावर पैसे जमा करायचे आहे त्याबाबत संमती पत्र सादर करावे लागणार आहे तर मृत वारसदारांच्या वारसांना वारसाचे शपथपत्र सादर करावे लागणार आहे व आधार कार्ड व पासबुकची झेरॉक्स ही जमा करणे बंधनकारक आहे.

                                           माहिती सौजन्य:- लोकमत e पेपर

                                                                         24/03/2023

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने