श्रीक्षेत्र राजुरेश्वराला मिळणार ' टॉय ट्रेन ' चे गिफ्ट ! मा. मंत्री रावसाहेब पा दानवे यांची संकल्पना ! वाचा सविस्तर !

    

                          नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखा मध्ये आपले स्वागत आहे.मित्रांनो आपणास माहीतच आहे की ,महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध क्षेत्र म्हणजेच राजुर गणपती हे फार प्रसिद्ध आहे. हे क्षेत्र जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका मधील एक क्षेत्र आहे.या जिल्ह्याचे खासदार माननीय केंद्रीय रेल्वे कोळसा व खाण  राज्यमंत्री मंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे हे आहेत. राजूर हे गाव त्यांनी विकास कामासाठी दत्तक घेतले आहे.याच विकासाच्या अनुषंगाने राजूर या तीर्थस्थळी अनेक विकासाची कामे करण्यात आली आहेत. आणि अजूनही भरपूर विकासात्मक कामे चालू आहेत.

                   रावसाहेब पाटील दानवे हे केंद्रामध्ये रेल्वे राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहे .रेल्वे हा विभाग माननीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या अधिपत्याखाली असून आपल्या या खात्याच्या माध्यमातून  फायदा घेण्यासाठी त्यांनी एक नवीन संकल्पना मांडली आहे.ती म्हणजे गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या असंख्य भाविकांच्या मनोरंजन आणि विरंगुळ्यासाठी राजूर मध्ये 'टॉय ट्रेन'चे गिफ्ट देण्याची . सेंटर रेल्वेने यासाठी 1 कोटी 29 लाख 56 हजार 494 रुपयाची निविदा प्रसिद्ध केली असून तीन महिन्यात काम पूर्ण करण्या साठी मूदतही देण्यात आली आहे .त्यामुळे राजूरकरांसह  समस्त महाराष्ट्रातील भाविकांना आता. ' टॉय ट्रेन'मधून राजुर गावाचे विहंगम दृश्य "याची देही याची डोळा" पाहता येणार आहे. पण त्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

                                          टॉय ट्रेन ही संकल्पना मोठमोठ्या महानगरामध्ये रुजलेली आहे.परंतु आता ती प्रत्यक्षात आपल्या परिसरात म्हणजे श्रीक्षेत्र राजुर मध्ये पाहायला व अनुभवायला मिळणार.आहे.केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या मूळ संकलपनेतून हे काम होणार आहे.यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनीही प्रथम जालना येथील छत्रपती संभाजी उद्यानात पाहणी केली. होती.त्यानंतर तीर्थक्षेत्र राजूर  येथील जागेची पाहणी केली व जागा योग्य असल्याचा अहवाल दिला, याच माध्यमातून आता सेंटर रेल्वे कडून हे काम केले जाणार आहे.

       त्यासाठीची निविदाही प्रसिद्ध झाली असून, निविदा ऑनलाइन दाखल करण्यासाठी 22 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली आहे .संबंधित एजन्सीला येत्या तीन महिन्यात हे काम पूर्ण करावे लागणार आहे.या ट्राय ट्रेन मुळे बच्चे कंपनीसह येणाऱ्या भाविक भक्तांना राजुर गडाची व गावाचे विहंगम दृश्य सफर घडणार आहे.

                          

                                    माहिती सौजन्य:- पुण्यनगरी e पेपर

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने