नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो आता बऱ्यापैकी कडक उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.आता घराबाहेर पडताना जरा जास्तच काळजी घ्यावी लागत लागणार आहे.त्यामुळे बाहेर पडताना आपण टोपी किंवा रुमाल घेऊनच बाहेर पडावे अशी आम्हीं आपणास आग्रह करतो .उन्हाळा असल्या कारणाने थंड शीतपेय ची मागणी वाढली आहे. यामध्ये उसाचा थंड रस असेल, ज्यूस सरबत असेल ,किंवा कोल्ड्रिंक्स असतील यांची आवर्जून हमखास लोक पीत आहे. गल्लोगल्ली आणि रस्त्याने थंड शीतपेय व कोर्डिंगसची दुकाने आपणास थाटलेली मिळतील,परंतु आपणास माहित आहे काय यामध्ये जी कोडींग मधील 10 ते 20 रुपयापर्यंत मिळणारे काही कोल्ड्रिंक्स हे फार घातक प्रकार मध्ये आलेले आहेत. आपल्या हातानेच आपण आपले आरोग्य अडचणीत आणत आहोत.
आपणास असे सांगायचे आहे की सध्या राज्य आणि सर्व शहरी व ग्रामीण भागात पडत उन्हामुळे किंवा कडक तापमानामुळे एनर्जीं ड्रिंक च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात कॅफिन घटक असलेली कोल्ड्रिक्स विकताना दिसून येत आहेत.पान टपरीवर किंवा थंड पेयांच्या कोणत्याही दुकानावर 10 ते 20 रुपयांमध्ये ही हे कोल्ड्रिंक्स सहज रूपात, लहान अथवा मोठ्यांना भेटत आहेत.ही कॅफेयुक्त पदार्थ आपण सेवन केल्याने सौम्य प्रकारची नशा होत असल्याने लहान मुले आणि महिला पुरुष या ड्रिंकच्या आहारी जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
कमी पैशात भेटणारे हे ड्रिंक सहजतेने उपलब्ध होत असल्याने व कमी पैशात परवडणारे असल्याने उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थीही,अभ्यास करण्यासाठी रात्री झोप येऊ नये म्हणून हे ड्रिंक घेताना दिसत आहे. वाहन चालक ही हे ड्रिंक्स मोठ्या प्रमाणात घेताना दिसून येत आहे. त्यामुळे गाडी चालवताना या ड्रिंक्स मुळे झोप येत नाही. शरीरामध्ये काही क्षणांमध्ये स्फूर्ती निर्माण होते व ही ड्रिंक पिल्याने काही काळ डोळे ताठर होऊन थोड्या प्रमाणात गुंगी आल्यासारखे वाटते. 75 मिली पेक्षा जास्त प्रमाणात कॅफेन घेऊ नये अशी ही या बाटल्यांवर नोंद आहे शिवाय लहान मुले गरोदर माता आणि स्तनदा माता यांनाही या ड्रिंक न घेण्याची या बाटल्यांवर स्पष्ट नोंद आहे. या प्रत्येक बाटलीमध्ये वीस मिलीला २१ मिलिग्रॅम कॅफेन असल्याची नोंद आहे मात्र या बाटल्या थेट 250 मिलीचे आहेत दिवसभरामध्ये 500 मिलि ग्राम पेक्षा जास्त कॅफेन कोणत्याही व्यक्तीने घेऊ नये असे तज्ञांनी स्पष्ट केलेले असले. तरीही सहजतेने उपलब्ध होत,असल्यामुळे जनसामान्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. व यामुळे लोक ह्या ड्रिंकच्या आहारी जात आहे.
काफिन युक्त कोर्डिंग्स काही प्रमाणात आरोग्यासाठी चांगले तर काही प्रमाणात आरोग्यासाठी वाईट असते. कॅफेयुक्त ड्रिंक घेणे आरोग्याच्या दृष्टीने काही प्रमाणात चांगले असते परंतु अति म्हणजेच 400 मिलिग्रॅम पेक्षा जास्त प्रमाणात एका दिवसात हे ड्रिंक घेतल्याने आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात खास करून हा परिणाम गरोदर माता, लहान मुले व स्तनदा माता यांच्यावर होऊ शकतो.
तज्ञांच्या मते आरोग्यावर काय होऊ शकतो परिणाम
कॅफेन हे वरील प्रमाणा पेक्षा जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास एक नशा होते. मेंदू व किडनी मज्जा रजजू निकामी होतो. गरोदर माता,स्तनपान करणाऱ्या मातांनी हे कोर्डिंग्स घेऊ नये व आपल्या बाळाला अपंगत्व किंवा मानसिक विकलांग होण्यापासून वाचवावे आपण जर थोड्या प्रमाणात चार-पाच वेळेस जर घेतले तर ह्या कोर्डिंगचे व्यसनच लागते.