Social media : अबब.... सोशल मीडिया चा भारतात सर्वाधिक वापर ! भारतीयांचा जास्त वेळ मोबाईल वर वायफळ ! वाचा सविस्तर !

 


           नमस्कार मित्रांनो KJMEDIA चे नवीन माहिती लेखांमध्ये आपले स्वागत आहे.मित्रांनो आज जगामध्ये जवळपास  8 अब्जाहून अधिक लोकांजवळ मोबाईल फोन आलेला आहे. त्यामुळे हे 5.3 अब्ज लोक इंटरनेट हमखास वापरतात. परंतु आपणास माहित आहे काय ? मोबाईल वापरण्याची मर्यादा आता कोणाला ही राहिली नाही, कि किती वेळ मोबाईल आपण वापरावा.आणि किती वेळ वापरू नये. अशी कोणतीही बंधने आपण आता ठेवली नाहीत. त्यामुळे आपल्या जीवनावर या मोबाईल अति वापराचा दुष्परिणाम जाणू लागला आहे.   या संबंधित एक माहिती आपल्यासमोर आली आहे जी ऐकून आपणास धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

                      रेड सियर या प्लॅटफॉर्म ने नुकताच एक अहवाल जाहीर केला आहे त्याचे म्हणणे आहे की जगाची लोकसंख्या आठ अब्ज पेक्षा अधिक असून त्यातील 5.3 अब्ज लोक हे इंटरनेटचा हमखास वापर करतात परंतु सोशल मीडिया वापरकर्त्यांची सर्वाधिक संख्या चीन  मध्ये आहे. मात्र भारतीय लोक सोशल मीडियाचा सर्वात जास्त वेळ वापर करतात,असे रेडसिअर या प्लॅटफॉर्म ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.

    ब्रिटन व अमेरिकेमध्ये एका व्यक्तीचे सरासरी 7 सोशल अकाउंट आढळून आले आहेत. तर भारतामध्ये हेच प्रमाण खूप जास्त प्रमाणात असून एका वक्तीचे सरासरी 11 अकाउंट आहेत.

सोशल ॲपचा याचा भारतात सर्वाधिक वापर

             भारतातील नागरिक दररोज जवळपास सरासरी 7.3 तास स्मार्टफोनवर घालवतात त्यातील जास्त वेळ ते सोशल मीडिया वापरण्यावर खर्च करतात. अमेरिका व चिनी नागरिकांचा जवळपास सरासरी स्क्रीन टाईम अनुक्रमे 7.1 तास व 5.3 तास आहे सोशल मीडिया वरील ॲप चा सर्वाधिक वापर भारतामध्ये होतो.

स्क्रीन टाईम सोशल मीडियाचा वापर जितका जास्त तितके मानसिक आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण  होण्याची शक्यता वाढते. 70 टक्के लोक झोप घेण्याच्या आधीही हातातून मोबाईल सोडत नाहीत. ते सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. असे एका पाहणीत आढळून आले आहे.

 स्टेटस व फोटोच्या माध्यमातून वास्तव जीवन पेक्षा वेगळे दाखवण्याचा प्रयत्न

          सोशल मीडियाचे वापर करते हे फोटोशॉप किंवा अशा दुसऱ्या अनेक ॲपचा फिल्टर चा उपयोग करून आपले फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असतात आपण आयुष्यात कसे आनंदी आहोत हे दुसऱ्यांना दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो पण प्रत्यक्षात अनेक माणसेही मधुन दु:खी असतात परंतु ही माणसे सोशल मीडियावर वास्तव जीवनापेक्षा वेगळे चित्र उभे करण्याचा प्रयत्न करत असतात.आपण आपल्या जीवनात शंभर टक्के कसे परफेक्ट आहोत. हे दाखवण्याचाही त्यांचा प्रयत्न असतो.  आणि अशाप्रकारे ते आपले स्टेटस ठेवत असतात.

         सोशल मीडिया वापरणाऱ्या मुलांपेक्षा मुलींच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.मुलींना सायबर बुलिंग,लेंगिक छळ,अशा गोष्टींचा सोशल मीडियावर सामना करावा लागतो. यामुळे मुलींच्या जीवनात असे काही प्रसंग येत असतात त्यामुळे त्यांचा मानसिक तणाव अधिकच वाढतो. अशा व्यक्तींना जीवनात जगत असताना नैराश्य येऊ शकते. व मानसिक संतुलन ढासळू शकते.

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने