नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो ग्रामपंचायत कारभारात महत्त्वाचे घटक असलेल्या ग्रामसेवक ग्रामविकास अधिकाऱ्यांना कार्यान्वित करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये कार्यालयीन वेळेत उपस्थित राहण्यासाठी यांसाठी आता बायोमेट्रिक हजेरीप्रणाली लागू करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. ग्रामीण भागातील गावाच्या विकासाचा कणा समजली जाणारी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी वेळेत उपलब्ध न झाल्याने नागरिकांची गैरसोय टळली असून आगामी काळात गावच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे.
ग्रामसेवकाला आता पूर्ण वेळ करावें लागेल काम
गावामध्ये कोणतेही शासकीय काम करण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्याची वाट बघण्याची किंवा ताटकळत बसण्याची आता वेळ नागरिकांवर येणार नाही, त्यांना शोधण्यासाठी धावा धाव करण्याची तसेच फोनवर संपर्क साधण्याची गरज तेथील नागरिकांना आगामी काळात पडनार नाही. कारण नुकताच एका अहवालानुसार प्रत्येक ग्रामसेवकाला आता बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लावावी लागणार आहे, त्यामुळे घंटे दोन घंटे बसणारा ग्रामसेवकाला आता पूर्ण वेळ पद्धतीने ग्राम पंचायत मध्ये बसावे लागणार आहे. त्यामुळे गावातील लोकांची कामे ही तात्काळ होणार आहे.
शासन स्तरावरील पत्र झाले जारी
बायोमेट्रिक हजेरी प्रणालीचे पत्र शासन स्तरावर तेथील गट विकास अधिकारी यांना प्राप्त झाले आहे.त्यामुळे तात्काळ कार्यवाही करून घेण्यात यावी, असा अहवाल शासन स्तरावर पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.मात्र ही पद्धत सुरू करण्यासाठी लागणारे यंत्रे अद्याप उपलब्ध नसल्याने ही पद्धत सुरू होण्यास अजून काही वेळ लागू शकतो परंतु बायोमेट्रिक हजेरीनंतर गावातील नागरिकांच्या समस्या अधिक वेगाने सुटणार आहेत. ग्रामसेवक ग्रामविकास अधिकाऱ्यांना लागू होणारी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली हे गावाच्या विकासासाठी वरदान ठरणारी असून गावाचा खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करण्याची गरज निर्माण झाली होती. त्यामुळे कमी लोकसंख्येच्या गावामध्ये ग्रामसेवकांचे येणे जाणे दुर्मिळ असायचे. त्यामुळे गावातील नागरिकांना त्यांचा खूप त्रास सहन करावा लागत असे .
सरपंच व लिपिक त्यांच्यावर ग्रामपंचायत कामाचा अधिक भार
गावांचा कारभार सरपंच त्या त्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांमार्फत मार्फत घातला जातो.ग्रामसेवक नसल्याने ग्रामपंचायत कार्यालय केवळ दोन ते तीन तास उपस्थित राहतात.त्यामुळे कर्मचारी मात्र ग्रामपंचायत उघडे न ठेवता कुलूप लावून घरी जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्यामुळेच हा निर्णय झाला आहे.