नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या माहिती लेखांमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो महाविकास आघाडी सरकारने मागील काळात बंद केलेली एक योजना परत आता बदललेले सरकार म्हणजे शिंदे सरकारने पुन्हा चालू करायची घोषणा केली आहे. ती योजना म्हणजे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अशी योजना आहे. या योजनेमुळे धरणातील गाळ काढून त्याचे खोलीकरण करून जास्त प्रमाणात पाणी साठा कसा होईल अशा पद्धतीने त्याचा काम केल्या जाते.
धरणातला निघालेला गाळ शेतकऱ्यांच्या शेतात मोफत
यातून निघालेला गाळ हा शेतकऱ्याच्या शेतापर्यंत देण्यात येतो. हा गाळ शेतकऱ्याला अगदी कोणतेही शुल्क न घेता देण्यात येतो. तेव्हा अशा पद्धतीची ही योजना आहे. नुकताच या संदर्भात वृद्ध जलसंधारण विभागाने सोमवारी हा शासन आदेश जारी करून या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. निर्णयानुसार पुढील तीन वर्ष राज्यात ही योजना राबवली जाणार आहे.
आघाडी सरकारच्या काळात बंद झालेली ही योजना शिंदे सरकारने केली परत चालू
गाळमुक्त धरण आणि गाळयूक्त शिवार ही योजना दिनांक 6 मे 2017 पासून राबविण्यात आली होती परंतु काही कारणास्तव मागील आघाडीचे सरकारने ही योजना नुकतीच बंद केली होती या योजनेची मुदत मार्च 2019 पर्यंत होती परंतु त्या अगोदरच आघाडी सरकारने या योजनेला बंद केल्यामुळे या योजनेला ब्रेक लागला होता परंतु आता शिंदे सरकारचे सत्तांतर झाल्यामुळे त्यामुळे ही योजना आता त्याच स्वरूपात परत राबविण्यात येणार आहे . मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीने जलसाठ्यातील गाळ काढून तो गाळ शेतकऱ्यांच्या शेतात थेट देण्यात येणार आहे आणि त्यासाठी शेतकऱ्याकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही असेही या शासन आदेशात म्हटले आहे.