नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखांमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो भारतामध्ये आपणास फिरायचे म्हटल्यास अनेक पर्यटन स्थळे आहेत. ज्यामध्ये उटी आहे.ताज महाल आहे , लेह लदाख आहे. असे अनेक टॉप प्रकारचे पर्यटन स्थळ भारतामध्ये आहेत. परंतु नुकतेच न्यूयॉर्क टाइम्स या जगप्रसिद्ध वृत्तपत्राने 2023 मध्ये भेट देण्याजोग्या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांची यादी प्रसिद्ध केली आहे. या टॉप टेन यादी मधील भारतातील एकाही पर्यटन स्थळाला स्थान मिळाले नाही. मात्र केरळ या राज्याने यामध्ये तेरावे स्थान मिळवले आहे. केरळ या राज्याला देवांची भूमी म्हणजेच 'गॉड्स ऑफ कंट्री'असेही म्हणतात.
येथील पर्यटन विभागाच्या जाहिरातीतून पर्यटन स्थळांचा प्रसार
भरमसाठ निसर्गरम्य वातावरण लाभलेल्या या राज्याच्या पर्यटन विभागानेही पर्यटन स्थळांच्या प्रसिद्धीसाठी कुठलीही कसर सोडलेली नाही. देश-विदेशात केरळ राज्याच्या पर्यटन स्थळांविषयी अनेक अनेक जाहिराती च्या माध्यमातून प्रसार करण्यात येत आहे.शिवाय पर्यटन संस्कृती वाढीस लागल्यामुळे तेथे भेट देणारा पर्यटक इतरांनाही तिथे जाण्यास प्रोत्साहन देतो. परिणामी देश-विदेशातील पर्यटकांचा इतर पर्यटन स्थळा पेक्षा जास्त ओघ केरळ राज्यामध्ये जास्त आहे. आणखी जास्त प्रमाणात हा ओघ वाढतच आहे.
यादीनुसार जगात केरळचे पर्यटन स्थळात 13 वे स्थान
समुद्रकिनारी पानथळ वैकुंठाअष्टमी सारख्या समृद्ध आणि सांस्कृतिक व वशिष्ठ पूर्ण खाद्यपदार्थ ही केरळ ची शक्ती स्थळे आहेत. प्राचीन ग्रामीण भारत कसा होता याचाही अनुभव या राज्यात पर्यटकांना येतो. त्यामुळे न्यूयॉर्क टाईमच्या यादीत तेरावे स्थान मिळवून राज्याचे नाव जगभरात प्रसिद्ध झाले आहे. या उत्तपत्राने कुमारकम आणि मरवांतुरुंथ या पर्यटन स्थळांचा विशेष उल्लेख केला आहे.
न्यूयॉर्क टाईम ची पर्यटन स्थळांची टॉप टेन यादी
१) लंडन
२) मोरी ओका (जपान )
३) शिल्पांचे खोरे नवाजो ट्रायबल पार्क (अमेरिका)
४) कीमार्टिन ग्लेन (स्कॉटलंड)
५)ऑक लँड (न्यूझीलंड)
६) पाम स्प्रिंग्स (कॅलिफोर्निया)
७) कांगारू बेट (ऑस्ट्रेलिया)
८) जोसा नदी (अल्बानिया)
९) त्रॉम्सो (नार्वे)
१०) अक्रा (घाना)
माहिती सौजन्य:- दैनिक पुढारी