Voter id : आता मतदार यादीत डबल असलेले नावे ॲपच्या मदतीने होणार डिलीट ! कसे होणार डिलीट ? वाचा सविस्तर !

  


                        नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखांमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो आजकाल मतदान करताना किंवा मतदान  याद्यांमध्ये यादी तपासताना आपणास अनेक याद्यांमध्ये दोन -दोन प्रकारांमध्ये मतदान करण्याचे प्रकार आढळतात यामुळे निवडणूक प्रक्रियेवर याचा विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे एकच मतदार दोन दोन ठिकाणी मतदान करण्याचे प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आता नवीन सॉफ्टवेअरचा वापर करून दोन किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी सारखे फोटो असलेले मतदार  शोधले आहेत अशा डबल फोटो किंवा नावे असलेल्या मतदारांची भेट घेऊन बीएलओ आता हे गरुडा ॲपच्या माध्यमातून कुठल्याही एका ठिकाणी मतदाराचे नाव ठेवून दुसऱ्या ठिकाणचे नाव डिलीट करणार आहेत.

     निवडणूक आयोगाने मतदार यादीतील छायाचित्रांची समान नोंदी शोधून त्यांची भूतनिहाय यादी तयार केली जाणार आहे. या संबंधित यादी ला बीएलओ  यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.

               गरुडा ॲप ला मतदारांचा चा डाटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. आता संबंधित बीएलओ मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची संमती घेतील व कुठल्याही एका ठिकाणी मतदाराचे नाव ठेवून दुसऱ्या ठिकाणांचे नाव डिलीट करण्यात येतील. जर मतदारांनी संमती न दिल्यास तर बीएलओ स्वतः त्यावर निर्णय घेतील व त्यावर कारवाई करेल.

अशा पद्धतीने ॲप करेल  काम

  1. मतदार जर आपल्याच सध्या स्थितीत असलेल्या भागात राहत असेल तर ओरिजनल पर्यायावर क्लिक करून नाव हे तेथे कायम ठेवले जाईल
  2. जर मतदार स्थलांतरित किंवा अनुपस्थितीत किंवा मृत्यू झाला असेल तर त्याची खातरजमा करून त्याचे नाव कमी केले जाईल.
  3. यादीतील मतदाराचा फोटो जर चुकीचा असेल तर फोटो मॅच होत नसल्याची नोंद घेऊन मत रद्द केली जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने