सुशिक्षित बेरोजगारांसाठी खुशखबर ! यावर्षी होणार 58 रोजगार मेळावे ! वाचा सविस्तर !



        नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो आज कल बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सुशिक्षित  बेरोजगारांची संख्या दिवसा गणित जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे सरकारही या बेरोजगारीवर अंकुश लावण्यासाठी रोजगार मिळावे घेत असतात. त्याच अनुषंगाने येणाऱ्या वर्षी सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मिळाले आयोजित होणार आहे. त्यामुळे या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष दिली पाहिजे.

           सुशिक्षित बेरोजगारांसाठी जानेवारी ते मार्च , २०२३ या कालावधीत जिल्हानिहाय जिल्हा कौशल्य विभाग विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने ५८ मेळाव्यांचे आयोजन केल्याचे विभागीय प्रशासनाने कळविले आहे. नववर्षातील सुरुवातीच्या तीन महिन्यांत रोजगाराच्या मोठ्या संधी यातून मिळणार आहेत .

               औरंगाबादेतील जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे जानेवारी , फेब्रुवारी • महिन्यांत प्रत्येकी ४ व मार्च महिन्यात २ मेळावे होतील . जालन्यात जानेवारीत २ , फेब्रुवारीत १ व मार्चमध्ये १ मेळावा ,परभणीत जानेवारी , फेब्रुवारी व मार्च महिन्यांत प्रत्येकी २ मेळावे , हिंगोलीत जानेवारीत २ फेब्रुवारीत ३ व मार्चमध्ये २ मेळावे होतील . नांदेडमध्ये जानेवारीत  २ फेब्रुवारीत ३ व मार्चमध्ये २ मेळावे , लातूरमध्ये जानेवारी २ फेब्रुवारी १ व मार्च २ मेळावे होतील . उस्मानाबादमध्ये जानेवारी ४ फेब्रुवारी ३ व मार्च २ मेळावे होतील . बीडमध्ये जानेवारी ४ फेब्रुवारी व मार्चमध्ये प्रत्येकी ३ मेळाव्यांचे आयोजन केले आहे . जानेवारी ते मार्च , २०२३ या कालावधीत ५८ रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येईल .

खालील पोर्टलवर मिळणार माहिती

                            पोर्टलवर मिळणार माहिती रोजगार मेळाव्याची अपडेट माहिती विभागाच्या वेबपोर्टल  https : //www.rojgarmahaswayam.gov.inवर देण्यात येईल . इच्छुकांनी जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा , असे आवाहन विभागीय आयुक्तालय , उपायुक्त कौशल्य विकास विभागाने केले आहे .




टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने