नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखांमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपल्या देशाने अनेका अनेक बाबतीत प्रगती केली आहे . ती औद्योगिक क्षेत्रात असो किंवा कृषी क्षेत्रात यापेक्षाही डिजिटल क्षेत्रात जास्त गतीने भारत आज अग्रेसर आहे. यामध्ये एक बाब म्हणजे भारत हा सर्वात मोठे डिजिटल प्लॅटफॉर्म निर्माण करीत आहे.यामध्ये अनेक योजनांच्या माध्यमातून डिजिटलायजेशन घडत आहेत. यामध्ये ऑनलाईन क्षेत्रावर जास्त भर देऊन मोदी सरकारने या क्षेत्रावर जास्त प्रमाणात प्रसार केला आहे .
अनेक क्षेत्रात घडले आहे डिजिटलायझेशन
2014 पासून आलेल्या मोदी सरकारने यावर जास्त प्रमाणावर काम केले आहे. यामध्ये एक म्हणजे बँकेत खाते नसलेल्या लोकांना जनधनच्या माध्यमातून बँक क्षेत्रात येण्यासाठी प्रवृत्त केले आहे. यामध्ये अनेक बाबतीत आधार आपल्या उपयोगात असते. त्यामुळे आधारला अनेक क्षेत्रात लिंक करून हे एक डिजिटलायझेशन घडून आणले आहे. यामध्ये सांगण्यासारखे अनेक क्षेत्रे आहेत परंतु आज आपणास एक नवीन माहिती घेणार आहोत. सरकार एक नवीन योजना घेऊन येत असल्याचे जाहीर झाले आहे.
चलनाच्या किमती एवढा असणार डीजल रुपया
रिझर्व्ह बँकेने डिजिटल चलनासंदर्भात मोठी घोषणा केली आहे . १ डिसेंबर रोजी सर्वसामान्यांच्या वापरासाठी डिजिटल रुपयाचा पहिला टप्पा लाँच केला आहे . हा रुपया डिजिटल टोकनच्या स्वरूपात आहे . त्याला चलनी नोटेप्रमाणेच लीगल टेंडर म्हणून मान्यता देण्यात आली आहे . ज्या ज्या मूल्यांची कागदी चलने ( नोटा ) आणि नाणी सध्या बाजारात उपलब्ध आहेत त्याच मूल्यांमध्ये डिजिटल रुपयाही जारी केला जाणार आहे . अर्थात हा पहिला टप्पा चाचणी म्हणूनच आहे . प्रथम मुंबईसह दिल्ली , बंगळूर , भुवनेश्वर या शहरांत तो लाँच झाला आहे . पुढच्या टप्प्यात अहमदाबाद , गंगटोक , हैदराबाद , इंदूर , पाटणा आदी शहरांतून डिजिटल रुपया सर्वसामान्यांसाठी सरू केला जाईल.यामध्ये दैनंदिन व्यवहार करता येतील नव्या बँकाही पुढे या उपक्रमात सहभागी होतील
इंटरनेट शिवाय होतील व्यवहार
इंटरनेटच्या माध्यमातून बिटकॉईन किंवा वन कॉईनसारखी आभासी चलन अस्तित्वात आल्यानंतर कोणत्याही दोन व्यक्तींत बँक किंवा कोणत्याही आर्थिक संस्थेच्या मध्यस्थीशिवाय खरेदी - विक्री व्यवहार शक्य करणारी डिजिटल रुपया ही आता वास्तवात येऊ घातलेली कल्पना आहे . आपल्या खात्यात असलेल्या पैशांचे डिजिटल रुपयात रूपांतर करता येते . कोणत्याही बँकेच्या खात्याशिवाय डिजिटल रुपयाद्वारे दैनंदिन व्यवहार करता येतील. व यासाठी आपल्याला इंटरनेटची सुद्धा गरज पडणार नाही यामुळे कागदी चलनाचा छापण्याचा खर्च कमी होईल व जास्त पैसा नागरिकांना खिशात सांभाळावा लागणार नाही.