नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखन मध्ये आपले स्वागत आहे.मित्रांनो नुकतीच काही दिवसात ग्रामपंचायत निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे आता गावातील मतदार आणि उमेदवार यांच्यातील संपर्क आता जास्त प्रमाणात वाढला आहे. निवडणूक आयोगाने ही फॉर्म भरण्यासाठी आपली ऑनलाइन वेबसाईट दिलेली आहे
ऑफलाइन पद्धतीने ही घेणार उमेदवारांचे अर्ज
विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी आज दिली
श्री. मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक (ऑफलाईन) पद्धतीने 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील.
ऑनलाईन फॉर्म भरताना वेबसाईट ही संथ गतीने चालत असल्याने अनेक उमेदवार हे फॉर्म भरण्यापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुटीवार यांच्या पाठपुराव्याने राज्यातील जिल्हाधिकारी यांना आदेश देऊन ऑफलाइन पद्धतीने ही अर्ज स्वीकारण्याचे सागितले आहे.
अनेक उमेदवार फॉर्म भरण्यापासून वंचित राहण्याची होती भीती
इच्छुक उमेदवार हे आपली उमेदवारी पक्की करण्यासाठी आपल्या मतदारांच्या भेटी करण्यात करण्यात व्यस्त झाले आहेत. यामध्ये ते आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या ही भेटीगाठी घेत आहेत व आपल्या गावातील संपर्क वाढवत आहेत. जे उमेदवार फॉर्म भरण्यासाठी इच्छुक आहेत. त्याच्यासाठी आयोगाने 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांना मुदत दिली आहे. त्यामुळे उमेदवारांची फॉर्म भरण्याची ऑनलाईन कामे चालू जोरदार चालू झाली होती , परंतु यामध्ये ऑनलाइन फॉर्म भरत असताना आयोगाची वेबसाईट मात्र 30 नोहेंबेर पासून संथ गतीने चालत असल्याने फॉर्म भरण्यास खूप अडचणी येत आहेत .त्यामुळे अनेक उमेदवार फॉर्म भरण्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती.
जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाचे तात्काळ आदेश
ह्या अडचणी लक्षात घेत माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी लक्ष घातले आणि त्यांनी निवडणूक आयोगास ऑफलाइन फॉर्म भरण्यासाठी पाठपुरावा केला त्यांच्या या पाठपुरावाची दखल निवडणूक आयोगाने घेतली.आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाने दिली आहेे. निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दि. १ डिसेंबर रोजी एक पत्र निर्गमित केले आहे. आणि तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन ऑफलाइन पद्धतीनेही ग्रामपंचायत उमेदवारांचे फॉर्म स्वीकारावे असे जाहीर केले आहे.