Note disappears from circulation:चलनातून 2000 च्या नोटा गायब ? कमी दिसत आहे चलनात 2000 ची नोट ? काय म्हणतो आरबीआयचा वार्षिक अहवाल ? वाचा सविस्तर

 


             नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे.मित्रानो काय आपणास माहित आहे.जेव्हा नोटबंदी झाली होती त्यावेळेस आपणास चलनाच्या बाबतीत किती बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. हे आपल्याला आठवत  असेलच परंतु सरकारने या नोटबंदीतील चलनातून बाहेर गेलेल्या किंवा बंद झालेल्या नोटांची कमी परत चलनामध्ये कव्हर करण्यासाठी एक हजार ऐवजी 2000 , 500 नवीन च्या नोटा छापल्या होत्या परंतु काळाच्या ओघात 500ची नोट चलनात अजूनही आहे परंतु 2000 ची नोट चलनामध्ये कमी प्रमाणात दिसून येत आहे. 2000 ची नोट चलनामध्ये कमी प्रमाणात का? दिसून येत आहे? त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे घेणार आहोत.

कमी प्रमाणात दिसत आहे चलनात 2000 नोट

         तुमच्या हातात 2000 रुपयांची गुलाबी नोट  शेवटच्या वेळी कधी आली होती?  मनावर थोडं जोर द्या की दोन हजार रुपयांची नोट सुट्टे करून घेण्यासाठी शेवटचं कधी इकडे तिकडे फिरला होता.  बराच वेळ गेला असेल. कारण आजकाल आपल्या चलनातील सर्वात मोठ्या 2000 च्या नोटांचे चलन कमी झाले आहे.किंव्हा चलनात कमी प्रमाणात दिसत आहे. काही काळापासून 2000 रुपयांच्या नोटा बाजारात कमीच पाहायला मिळतात.  नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नव्या गुलाबी नोटा वितरीत केल्या होत्या. मात्र, गेल्या काही काळापासून या नोटा लोकांच्या हातात कमीप्रमाणात दिसून येत आहेत.  त्यामागे एक मोठे कारण आहे.

2000 च्या नोटा कधी जारी झाल्या?

नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट जारी केली.  8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या सर्व नोटा चलनातून बंद करण्यात आल्या. या चलनांऐवजी रिझर्व्ह बँकेने 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या होत्या.  रिझर्व्ह बँकेला विश्वास होता की चलनातून बाहेर पडलेल्या नोटांच्या मूल्याची 2000 रुपयांची नोट सहजपणे भरपाई करेल.  अहवालानुसार, 2000 रुपयांची नोट जारी केल्यामुळे इतर नोटांची गरज कमी झाली.


हे पण वाचा:- आपल्या भारतीय नोटांवर महात्मा गांधींचा फोटो कधी आणि का छापला? वाचा सविस्तर 


काय म्हणतो रिझर्व बँकेच्या वार्षिक अहवाल


      रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात याबाबत म्हंटले आहे की,  2000 रुपयांच्या नोटांच्या तुटवड्याचे मोठे कारण समोर आले आहे. ते म्हणजे  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2019-20, आर्थिक वर्ष 2020-21 आणि आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 2000 रुपयांची एकही नवीन नोट छापण्यात आलेली नाही.  त्यामुळे बाजारात 2000 रुपयांच्या नोटांचे चलनाचे प्रमाण कमी झाले आहे.

काय ? 2000 ची नोट बंद झाली आहे?

31 मार्च 2017 पर्यंत, चलनात असलेल्या नोटांच्या एकूण मूल्यामध्ये 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा 50.2 टक्के होता.  त्याच वेळी, 31 मार्च 2022 रोजी चलनात असलेल्या एकूण नोटांच्या मूल्यात 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा घासरून 13.8 टक्के कमी झाला.  रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट बंद केली नसली तरी त्याची छपाई मात्र बंद झाली आहे.

केव्हापासून छापली नाही 2000 ची नोट?

2000 च्या नोटा 2017-18 मध्ये देशात सर्वाधिक चलनात होत्या.  यादरम्यान बाजारात 2000 च्या 33,630 लाख नोटा चलनात होत्या.  त्यांची एकूण किंमत 6.72 लाख कोटी रुपये होती.  2021 मध्ये मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत माहिती दिली होती की, गेल्या दोन वर्षांपासून 2000 रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही.  वास्तविक, आरबीआयशी बोलल्यानंतर सरकार नोटांच्या छपाईबाबत निर्णय घेत असते.  एप्रिल 2019 पासून मध्यवर्ती बँकेने 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नसल्या मुळे 2000 रुपयांच्या नोटांची छपाई न केल्यामुळे त्या आता लोकांच्या हातात कमी दिसत आहेत.  त्यामुळेच एटीएममधून या नोटा फार कमी वेळा बाहेर पडत आहेत.  येत्या काळात रिझव्‍‌र्ह बँक त्याची छपाई सुरू करणार की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
परंतु तरीही एक प्रश्न पडतो की  छपाई झालेल्या 2000 रुपयाच्या ज्या नोटा चलनात होत्या त्या कुठे गायब झाल्या आहेत.
                                      माहिती सौजन्य:- आज तक हिंदी

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने