नमस्कार मित्रांनो की KJMEDIA च्या नवीन माहिती लेखांमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो मागील काही दिवसापासून अशी बातमी येत होती की UIDAI ने असे म्हटले आहे की 10 वर्षे जुने आधार कार्ड ला अपडेट करणे किंवा अध्ययवत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु आता UIDAI ने ट्विटरवर एक ट्विट करत म्हटले आहे की आधार अपडेट करणे हे अनिवार्य नसेल. पण तरीही भारतीय नागरिकांना आव्हान केले आहे की नागरिकांनी स्वतःहून आपले आधार अद्यावत करून घ्यावे
अनेक सरकारी योजनांसाठी आधार महत्वाचे
आजच्या काळात आधार कार्ड हे आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे, ह्या आधार कार्ड शिवाय आपण आपल्या घरून सरकारी कामाचा विचारही करू शकत नाही. अनेक सरकारी योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर अनिवार्य झाला आहे. परंतु मागील काही दिवसांमध्ये असे ऐकण्यास येत होते की आधार अपडेट हे 10 वर्षानंतर करणे अनिवार्य असेल परंतु आता UIDAI ने ट्विट करून जाहीर केले आहे की ज्यामध्ये तुमचा आधार जारी होऊन 10 वर्षे झाली असतील, तर ते अपडेट करणे बंधनकारक राहणार नाही.
वास्तविक पाहता, काही काळापासून ही बातमी समोर येत होती की, 10 वर्षांत एकदाही ज्यांनी आपले आधार कार्ड अपडेट केले नाही, त्यांना आधार कार्ड अपडेट करणे अति आवश्यक करण्यात आले आहे. परंतु तूर्तास हे टळले आहे. अशी माहिती uidai ने दिली आहे
आधार अपडेट करणे हे अनिवार्य व सक्तीचे नाही
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने नुकतेच एक प्रसिद्धी पत्र जारी केले होते की आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य व सक्तीचे नाही. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पत्रकार परिषदेत मध्ये असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की देशातील नागरिक 'हे' आधार अपडेट करू शकतात म्हणजेच दर 10 वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांचे आधार कार्ड अपडेट करू शकतात. पण हे अनिवार्य व अति आवश्यक नाही.
आधार अपडेट अनिवार्य नसतानाही तरीही करावे आधार अपडेट
अनेक वेळा मुलींच्या लग्नानंतर व्यक्तीचा पत्ता बदलतो किंवा आडनाव बदलते, अशा परिस्थितीत आधार अपडेट व्हायला हवा. UIDAI देशातील सर्व नागरिकांना त्यांचे आधार दस्तऐवज अद्ययावत म्हणजेच अपडेट करण्याचे आवाहन करत आहे. आणि त्यांना तसे करण्यास प्रोत्साहनही देत आहे.
आधार संबंधित कोणत्याही माहितीसाठी या नंबर वर कॉल करा
आता आधारशी संबंधित सर्व समस्या एका फोन कॉलवर सुटणार आहेत. ट्विटमध्ये लिहिले आहे की आधार हेल्पलाइन 1947 हिंदी, इंग्रजी, तेलगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, उडिया, बंगाली, आसामी आणि उर्दू या 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे. 1947 या नंबरला कॉल केल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाषेत संवाद साधू शकता.
UIDAI ने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे.
हा क्रमांक भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) जारी केला आहे. हा हेल्पलाइन क्रमांक 1947 आहे. हा आकडा लक्षात ठेवणे देखील अगदी खूप सोपे आहे . कारण देशाला स्वातंत्र्य मिळाले तेच हे वर्ष आहे.