नमस्कार मित्रांनो KJ MEDIA च्या नवीन माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो जेवणामध्ये ती तिखटपणा शिवाय ती जेवणाची चव काय? त्यामुळे तिखट जेवणामुळे जेवणाची एक वेगळीच परिभाषा असते. त्यामुळे तिखट ही गोष्ट आली तर मिरची ही डोळ्यासमोर येणारच आणि मिरच्या म्हटले की , त्यामध्ये आपणाला अनेक प्रकारच्या मिरच्या आठवतील यामध्ये आपल्या रेगुलर वापरात येणाऱ्या छोट्या मिरच्या असतातच ,त्यातच दुसऱ्या म्हणजे ढोबळ्या मिरची ला कसे विसरणार. ढोबळ्या मिरच्यांमध्येही तीन रंगबेरंगी मिरच्या असतात.यामध्ये हिरव्या, पिवळ्या ,लाल अशा मिरच्यांचा समावेश होतो परंतु आपणास माहित आहे या तिन्ही प्रकारच्या ढोबळी मिरची मध्ये अनेक गुण सत्व सामावलेले आहे. जे आपल्या शरीराला अनेक आरोग्यकारक फायदा देतात. यामध्ये आज आपण पिवळ्या ढोबळी मिरची विषयी विशेष माहिती घेणार आहोत चला तर जाणून घेऊया पिवळ्या ढोबळी मिरची विषयी आपल्या आरोग्यासाठी कशी फायदेशीर असते.
चवी व्यतिरिक्त ढोबळी मिरचीमध्ये अनेक आरोग्यकारक फायदे
तुम्ही अनेकदा बाजारात शिमला किंव्हा ढोबळी मिरची पाहता, त्यांचा रंग हिरवा असतो. यावतीरिक्त लाल आणि पिवळ्या रंगाच्या ही सिमला मिरच्या असतात. ही मिरची फक्त चवीलाच छान असते असे नाही तर त्यांचे अनेक आरोग्य फायदेही आहेत, विशेषतः म्हणजे पिवळ्या रंगाची सिमला मिरची आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रंगीबेरंगी फळे आणि भाज्या खाणे आरोग्यासाठी चांगले असते. मधीलच पिवळ्या सिमला मिरचीमध्ये अनेक पोषक घटक असतात. पिवळ्या सिमला मिरचीमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे फ्री रॅडिकल्सशी लढतात. त्यामुळे अनेक शारीरिक आणि विशेषत: त्वचेशी संबंधित समस्या उद्भवण्यापासून रोखल्या जातात. किंवा फ्री रॅडिकल्समुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो. पिवळ्या सिमला मिरचीचे सेवन केल्याने शरीरातील फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत होते. पिवळी शिमला मिरची शरीरातून , शरीराला नको असलेले घटक बाहेर टाकण्यास मदत करते. त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि आहारातील फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ही भाजी 'नॅचरल बॉडी क्लीनर' म्हणून काम करते तर लाल मिरचीचा पचनाशी संबंध असतो.
पचन संस्था आणि हृदयविकार यावर परिणामकारक ढोबळी मिरची
जर तुम्हाला पचनाची समस्या असेल तर तुम्ही हिरवी, लाल आणि पिवळी शिमला मिरचीचे सेवन करू शकता. कारण, त्यामध्ये फायबर असते, जे आतडे स्वच्छ ठेवण्यास मदत करते. पचनसंस्था आणि आतड्यांसंबंधी हालचाल नियंत्रित करून, पिवळी शिमला मिरची उच्च कोलेस्ट्रॉल किंवा एलडीएल कमी करण्यास मदत करते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, त्यामुळे वजनही नियंत्रणात राहते. पिवळ्या सिमला मिरचीच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
केसांच्या आरोग्यासाठी ही फायदेशीर
केसांच्या आरोग्यासाठी पिवळी शिमला मिरची देखील महत्त्वाची आहे. पिवळ्या सिमला मिरचीमुळे केसांचे कूप सक्रिय होण्यास आणि स्कॅल्प निरोगी ठेवण्यास मदत होते. पिवळ्या सिमला मिरचीमध्ये 'क' जीवनसत्व असते, जे सर्दी, खोकला आणि खाज सुटणारी पुरळ इत्यादींशी लढण्यास मदत करते.
माहिती सौजन्य :-दैनिक पुढारी पेपर