नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन मनोरंजक माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो सध्या ऋषभ शेट्टी यांच्या कांतारा या कन्नड चित्रपटाची फार चर्चा आहे. सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यानंतर तो चित्रपट हिंदी, तेलुगु, तामिळ आणि मल्याळम या भाषेत प्रदर्शित झाला . हिंदीमध्ये प्रदर्शित झाल्याने या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत लोकांची वाह वाह मिळवली आहे.
सध्या सगळ्याच भारतीयांच्या तोंडी ‘कांतारा’ या चित्रपटाचे हे नाव आहे. या कन्नड चित्रपटाने केवळ भारतालाच नव्हे तर साऱ्या जगाला भुरळ घातली आहे. २०० कोटी ची कमाई करत या चित्रपटाची यशस्वी घोडदौड अजूनही सुरूच आहे. या चित्रपटाचं लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता रिषभ शेट्टी हा रातोरात स्टार झाला आहे. या चित्रपटामुळे जणू त्याला एक नवी ओळख मिळाली आहे.
अनेक दिग्गजांनी पाहिला हा चित्रपट व केली प्रशंसा
दिवाळीमध्ये बॉलीवूडमधील दोन बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाले होते परंतु प्रेक्षकांनी या चित्रपटाऐवजी कांतारा या हिंदी वर्जन चित्रपटाला पाहण्याला जास्त पसंत केले आहे. प्रेक्षकांसहित अनेक चित्रपट समीक्षकांना या चित्रपटाने भुरळ घातली आहे. अनेक दिग्गज यांनी हा चित्रपट पाहिला आहे. या चित्रपटाला त्यांनी चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये श्री श्री रविशंकर महाराज यांनी सुद्धा त्यांच्या आश्रमात हा चित्रपट पाहिला आहे व याव्यतिरिक्त केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुद्धा हा चित्रपट नुकताच बघितला आहे त्यांनीही ट्विटर वर या चित्रपटाची खूप प्रशंसा केली आहे. तर सुपरस्टार रजनीकांत यांनीही या चित्रपटाची खूप प्रशंसा केली आहे व ऋषभ शेट्टी ला शुभेच्छा दिल्या आहेत.
ऋषभ शेट्टी यांची स्वतः मुख्य भूमिका, लेखन आणि दिग्दर्शन
कांतारा चित्रपटांमध्ये स्वतः ऋषभ शेट्टी यांनी मुख्य भूमिका साकारून या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. शिवा हे मुख्य पात्र त्यांनी या चित्रपटामध्ये साकारले आहे. कर्नाटक मधील लोककथांचा प्रभाव या चित्रपटामध्ये प्रामुख्याने जाणवतो. या चित्रपटामध्ये कर्नाटक मधील "भूत कोला"या पारंपरिक नृत्य प्रकाराला प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे आता बॉलीवूड ने ही साउथच्या या चित्रपटांची प्रेरणा घ्यायला हवी आणि त्याच प्रकारे त्यांनी चित्रपटांची निर्मिती करायला पाहिजे. भारतीय संस्कृतीला गृहीत धरून चित्रपट बॉलीवूडमध्ये ही बनले पाहिजे.