नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो राज्यातील कामगार बांधवांना एक खुशखबर आहे. आता नोंदणीकृत कामगाराला प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घरकुल देण्यात येणार आहे. याची घोषणा राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केली आहे लवकरच या घरकुल योजनेचा शुभारंभ होणार आहे. नुकतीच माननीय मंत्री महोदय सुरेश जी खाडे यांनी कामगार विभागाची एक आढावा बैठक घेतली होती त्यामध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे.
राज्याच्या विकासामध्ये कामगार हा महत्त्वाचा घटक असून , कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत घरकुल देण्यात येणार आहे . या योजनेंतर्गत घरकुलासाठी अडीच लाख रुपये मिळतात . यात कामगार विभागाकडून प्रत्येकी अडीच लाख रुपये देऊन नोंदणीकृत कामगारांना घरकुल देण्याचा निर्णय घेतला असल्याचे कामगारमंत्री डॉ सुरेश खाडे यांनी शनिवारी ता .५.११.२०२२ जाहीर केले . डॉ . खाडे यांच्या उपस्थितीत कामगार विभागाची एक आढावा बैठक घेण्यात आली होती , या बैठकीनंतर खाडे यांनी पत्रकारबांधवांशी संवाद साधला .या घरकुलासाठी गायरान , गावठाण तसेच एमआयडीसीमध्ये जमिनींचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
हे पण वाचा : state government jobs:येत्या वर्षभरात 75 हजार युवकांना नोकरी देणार माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा!
प्रत्येक जिल्ह्यात असेल कामगार भवन
यावेळी खाडे म्हणाले की, कामगार विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आल्यास प्रशासकीयदृष्ट्या कामकाज करणे सोईचे व सोपे होणार आहे , त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन बांधण्यात येणार आहे.
आता 1 रुपयात होणार कामगार नोंदणी
पूर्वी कामगार नोंदणीसाठी 25 रुपये असे शुल्क आकारले जायचे परंतु आता आता हे शुल्क कमी करून 1 रुपयांमध्ये कामगार नोंदणी होणार आहे . त्यामुळे अधिका अधिक कामगारांनी कामगार नोंदणी करून घ्यावी असे आव्हान माननीय मंत्री सुरेश जी खाडे यांनी केले आहे.