Maratha Business Loans: व्यवसाय करण्यासाठी मराठा तरुणांना मिळणार एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज! वाचा सविस्तर

              नमस्कार मित्रांनो की KJMEDIA च्या नवीन माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहतो आहे की मराठा तरुणांची परिस्थिती फार दयनीय झालेली आहे. सरकारी नोकरी नसल्यामुळे  अनेक मराठा तरुण बेरोजगार झालेले आहे. परंतु अशा तरुणांना नोकरीवर अवलंबून न राहू देता त्यांना व्यवसायात येण्यासाठी अण्णासाहेब  पाटील  आर्थिक मागास विकास महामंडळ  अनेक योजना राबवत असते. यामधूनच आता आता एक नवीन योजना महामंडळाने राबवायची ठरवली आहे. ती म्हणजे   यामध्ये मराठा तरुणांना व्यवसाय करण्यासाठी दहा हजारापासून तर एक लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची योजना आखली आहे. त्यामुळे व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांना या योजनेचा मोठा लाभ मिळू शकतो.


                सरकारच्या या कर्ज योजनेमुळे अनेक मराठा तरुणांना याचा फायदा होणार आहे. व तरुणांचे उद्योजक होण्याचे स्वप्न साकार होणार आहे. या योजनेमुळे अनेक तरुणांना व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. व्यवसाय इच्छुक मराठा तरुणांना त्यांची मदत होणार आहे.त्यामुळे महामंडळाने या योजनेत मराठा तरुणांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

कसे असेल हे कर्ज प्रकरण

             यामध्ये सर्वप्रथम तरुणांना 10000 पर्यंत कर्ज मिळेल आणि ते कर्ज त्याने कसे प्रकारे व्यवस्थापित केले व परतफेड केली.यावर यावर गृहीत धरून परत त्याला त्यानंतर 50000 हजार रुपया पर्यंत कर्ज मिळेल,परत  हेच कर्ज त्याने व्यवस्थितरित्या महामंडळास परतफेड केली तर, त्याचा व्यवसायाचा व्यवहार पाहून त्याला परत पुढच्या ट्प्यात 100000 रुपये पर्यंत कर्ज देण्यात येईल अशा प्रकारे मराठा  तरुणांना कर्जाचा  लाभ घेता येईल.

कर्जाची परतफेड कशी असेल

* जेव्हा सर्वप्रथम दहा हजार रुपयांचे कर्ज मिळेल त्यावेळी याची परतफेड दहा रुपये प्रति दिवस प्रमाणे याची  परतफेड करावी लागेल.

*दहा हजार रुपये ची  योग्यरीत्या परतफेड केली तर परत 50000 पर्यंत कर्ज युवकाला मिळेल आणि याचा याची परतफेड पन्नास रुपये प्रति दिवस प्रमाणे मराठा तरुणांना करावी लागेल.

*त्यानंतर पन्नास हजार रुपयाची परतफेड जर योग्यरीत्या त्याने केली तर महामंडळ त्या तरुणाला परत 100000  रुपये पर्यंत कर्ज देईल आणि याची परतफेड 100 रुपये प्रति दिवस प्रमाणे असेल अशा प्रकारे ही योजना असेल योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाने तरुणांची 60 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवली आहे.

कोण कोणते कागदपत्रे लागतील

1) आधार कार्ड

2) रहिवासी पुरावा

3) उत्पन्नाचे प्रमाणपत्र

4) जातीचे प्रमाणपत्र

हा अर्ज कुठे करावा

        हा अर्ज मराठा तरुणांना अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्या https://udyog.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर जाऊन करावें लागेल.

या संदर्भातील वृत्तपत्राची जाहिरात येथे बघा 

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने