lunar eclipse:आज होणार खंडग्रास चंद्रग्रहण ! कसे होते चंद्रग्रहण?वाचा सविस्तर

     


             नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या माहिती लेखामध्ये आपला स्वागत आहे मित्रांनो  अनेक प्रकारचे ग्रहण हे होत असतात.  नुकतेच काही दिवसांपूर्वी सूर्यग्रहण होऊन गेले. त्यावेळेस सूर्याचा काही भाग  झाकून गेला होता. त्यावेळेस पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र हा काही प्रमाणात आला होता त्यामुळे पृथ्वीवरील लोकांना हा सूर्य  यांच्या काही भागवर चंद्र आल्याने सूर्यग्रहण झाले होते. याच पार्श्वभूमीवर आता चंद्रग्रहण सुद्धा होणार आहे. आणि हे कसे होणार आहेत याची माहिती आपण सविस्तर जाणून घेऊ.

कसे घडते चंद्रग्रहण

               मित्रांनो चंद्रग्रहण हे आपण अनेकदा पाहिले असेल. आज खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. यामध्ये चंद्र हा पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीने झाकला जाऊन चंद्र दिसेनासा होणार आहे. हे ग्रहण होते कसे हे आपण सविस्तर जाणून घेऊया. जेव्हा सूर्य ,पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात त्यावेळेस चंद्रग्रहण घडते म्हणजेच  सूर्याचा प्रकाश हा पृथ्वीवर पडतो आणि पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडते,त्यामुळे पूर्णत्व प्रकाशमय झालेला चंद्र हा पूर्णपणे  पृथ्वीच्या सावलीने झाकला जातो, आणि यामुळेच खग्रास हे चंद्रग्रहण घडते. एका वर्षामध्ये मध्ये आपणास दोन तरी चंद्रग्रहण पाहण्या पहावयास मिळतात

देशात आणि जगात दिसणार चंद्रग्रहण वेळ प्रमाण वेगवेगळे असेल

                 हे चंद्रग्रहण महाराष्ट्रातून नव्हेच तर संपूर्ण देश जगातून वेगवेगळ्या भागातून आपणास पहावयास मिळणार आहे परंतु या वेगवेगळ्या भागातून चंद्रग्रहण सुरू होण्याचा वेळ हा भोगोलिक स्थितीनुसार वेगळा असणार आहे. त्यामुळे याच्या वेळ प्रमाण हे वेगवेगळे असेल.

पुढील वर्षी म्हणजे 2023 ला होणार चार ग्रहणे....

               २०२३ मध्ये एकूण चार ग्रहणे होणार आहेत. त्यात २०/४/२०२३ रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार आहेत. तर ५/६ मे २०२३ रोजी छायाकल्प चंद्रग्रहण होऊ शकते. १४/१०/२३ रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण आणि शेवटी २८,२९ ऑक्टोबर २०२३ रोजी खंडग्रास चंद्रग्रहन होणार आहे. पृथ्वीवरची होणारी दररोजची रात्र हा सुद्धा एक सावलीचाच प्रकार असून अशा प्रकारची ग्रहणे सूर्यमालेत सतत होत असतात.


ग्रहणे होणे ही अंधश्रद्धा नसून हा केवळ भौगोलिक ऊन सावलीचा खेळ...

             ग्रहणे हा केवळ उन - सावल्यांचा खेळ असून त्याबद्दल मनात अंधश्रद्धा ठेवणे अगदी चुकीचे आणि अवैज्ञानिक आहे. या ग्रहांचा सर्व नागरिक आणि विध्यार्थ्यांनी शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास केला पाहिजे. चंद्रग्रहण पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज पडत नाही. पूर्व दिशेला उंच ठिकाण असेल त्या ठिकाणाहून दक्षिण दिशेकडे आपणास चंद्रग्रहण व्यवस्थित दिसेल अशा मैदानांत किंवा घराच्या सुरक्षित छतावर जावून साध्या डोळ्याने किंवा लहान दुर्बीण ने पहावे.

                                          माहिती सौजन्य:- महाराष्ट्र टाइम्स

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने