Akshay kumar: अक्षय कुमार आता एका बिग बजेट मराठी चित्रपटात दिसणार ! कोण आहे निर्माता? केव्हा होणार प्रदर्शित? जाणून घ्या सविस्तर

     नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन मनोरंजक माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो बॉलीवूड मधील अक्षय कुमार आपल्याला माहितीच आहे. पण 2022 हे वर्ष अक्षय कुमारच्या सर्व फिल्म्स साठी फार वाईट गेले आहे कारण या वर्षीच्या अक्षय कुमारच्या 4 फिल्म  फ्लॉप झाल्या आहेत .अक्षय कुमारला या वर्षात एकही  चित्रपट हिट गेला नाही.  


              या वर्षाच्या सुरुवातीला आलेला त्याचा बच्चन पांडे हा चित्रपट  फ्लॉप झाला.  यानंतर सम्राट पृथ्वीराज चौहान आला, ज्यांच्याकडून त्याला खूप आशा होत्या, तोही फ्लॉप झाला.  हा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे मेकर्सना खूप मोठे नुकसान सोसावे लागले.  त्यानंतर रक्षाबंधन आला आणि तो ही फ्लॉप ठरला.  नुकत्याच प्रदर्शित झालेल्या' राम सेतूची' स्थितीही बॉक्स ऑफिसवर विशेष खास दिसत नाही. त्यामुळे अक्षय कुमार हा आता एका मराठी चित्रपटात  मुख्य भूमिकेत दिसणार आहे हा चित्रपट आहे. महेश मांजरेकर यांचा आणि या चित्रपटाचे नाव आहे  "वेडात मराठे वीर दौडले सात"

अक्षय कुमार साकारणार बिग बजेट मराठी चित्रपटत मुख्य भूमिका

      अक्षय कुमार आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या "वेडात मराठे वीर दौडले सात" छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. 2023 च्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. चित्रपटाचे बजेट 300 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. काल रात्री एका मोठ्या कार्यक्रमात या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.


मुंबईतील एका कार्यक्रमात महेश मांजरेकर यांनी जाहीर केले

                         मुंबईत नुकतेच""वेडात मराठे वीर दौडले सात"  या चित्रपटासाठी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महेश मांजरेकर यांनी त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली, तसेच अक्षय कुमार त्यांच्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत असल्याचे उघड केले. या कार्यक्रमात अक्षय कुमार हा विशेषतः उपस्थित होता, ज्याला पाहून मीडियाला धक्काच बसला. यावेळी महेश मांजरेकर-अक्षय कुमार यांच्याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आणि संस्थापक राज साहेब ठाकरे हेही उपस्थित होते.

2023 मधील दिवाळीला प्रदर्शित होणार चित्रपट

अशी बातमी मिळत आहे की, "वेडात मराठे वीर दौडले सात"  केवळ मराठीतच नाही तर हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्येही प्रदर्शित होईल. निर्माता वसीम कुरेशी यांच्या कुरेशी प्रॉडक्शनद्वारे निर्मित, हा चित्रपट 2023 च्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच सूर्यवंशी (2021) आणि राम सेतू (2022) नंतर अक्षयची ही सलग तिसरी दिवाळी रिलीज असेल.

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने