शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता होणार उपग्रहाद्वारे अचूक जमीन मोजणी ! शेतकऱ्यांना मिळणार योग्य न्याय ! वाचा सविस्तर

    


    नमस्कार शेतकरी मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे. मी शेतकरी मित्र अशासाठी म्हटले आहे की हा लेख माझ्या शेतकरी मित्रांसाठीच आहे. मित्रांनो जेव्हा सातबाराचा विषय येतो तेव्हा आपली जमीन आपल्याला लक्षात येते.

          यामध्ये भांडणे, बांधारा कोरणे, रस्ता न देणे, किंवा जमीन कमी भरणे, अशा अनेक गोष्टींमुळे गावागावात, भावाभावात भांडणे होताना दिसतात, जमिनींचे भाव हे आता गगनाला भिडलेले  आहेत.कारण जमिनीचे महत्व आता सर्वांना कळू लागले आहे.त्यामुळेच जमिनींचे भाव हे आता फार वाढलेले आहेत.  जमिनीच्या छोट्या तुकड्यांसाठी शेतकऱ्यांमध्ये भांडणे होताना दिसत आहे भांडणे. त्यामुळे कोटकचऱ्यांच्या पायऱ्या चढाव्या लागत आहे. परंतु ही भांडणे आता होऊ नये,  घेतलेली जमीनचा बंधारा कोणी कोरू नये. घेतलेली जमीन ही सातबारा वर उताऱ्यावर शाबूत जागेवर आहे काय? घेतलेली जमीन ही  पूर्णपणे आपल्या ताब्यात आली आहे का?अशा अनेक प्रश्नांसाठी  आता  भूमी अभिलेख कार्यालयाने एक नवीन तोडगा शोधला आहे.

सातबारा उतारा उपग्रह नकाशाला जोडून मोजणी होणार

               यासाठी आता भूमी अभिलेख कार्यालयाने  सातबारा उताऱ्याला उपग्रहाद्वारे उपलब्ध असलेल्या नकाशाला जोडून अचूक मोजणी होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन पाऊले उचलली आहेत. बारामती व खुलताबाद तालुक्यातील प्रत्येकी दहा गावांमध्ये हा उपक्रम चालू झालेला आहे परंतु येत्या दोन वर्षांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये हा उपक्रम चालू होणार आहे.

                  एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या सातबाऱ्यावर उपलब्ध असलेल्या जमिनीपेक्षा कमी जमीन असेल आणि त्याच्याकडून सातबारा वर असलेल्या जमिनी एवढा महसूल गोळा केला जात असेल, तर हा त्याच्यावर अन्याय होत आहे, त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयाने हा सुद्धा एक विचार केला आहे.एखांद वेळी जमिनी खरेदी केली गेल्यास शेतकऱ्याला त्याच्या पैशाच्या मोबदल्यात मिळालेली जमीन ही योग्य मोजमापात आहे काय हे देखील तपासण्यासाठी ही नवीन आखणी भूमी अभिलेख व जमावबंदी आयुक्तालयाने एका उपक्रमा द्वारे बारामती व खुलताबाद तालुक्यातील प्रत्येकी दहा गावात   चालू केलेला आहे.

भूमी अभिलेख कार्यालयाला या मुळे जमीन मोजणीत फायदा होणार व अतिक्रमण थांबणार.

१) या उपग्रह द्वारे मोजलेल्या नकाशामुळे एखाद्या शेतकऱ्याच्या शेती हद्दीपासून दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन मोजण्यास भूमी अभिलेख कार्यालयाला सोपे जाईल.

२) जीआयएफ रेफरसिंग मॅप मुळे जमीन मोजणे सोपे जाईल व जमिनीचे नकाशे पाहता येईल.

३) सरकारी तसेच खाजगी जमिनीवरील अतिक्रमणे थांबवण्यास मदत होईल.

कसे काम करेल ही सिस्टीम

            जमिनीचा सातबारा उपग्रहाद्वारे काढलेल्या नकाशाला जोडण्यात येईल,यासाठी जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीमचा वापर केला जाणार आहे. यात उपग्रह रोवरमशीन द्वारे जमिनीचे किंव्हा तुकड्यांचे अक्षांश व रेखांश मिळतील. मिळालेल्या अक्षांश व रेखांश प्रत्यक्ष जागेच्या ठिकाणी जोडून सातबारा उताऱ्याशी जोडली जातील. त्यामुळे शेतकऱ्याचा असलेला सातबारा हा .आहे त्या स्थितीत आहे की शेजाऱ्याने कोरून खाल्ला आहे.हे कळणार आहे.त्यामुळे शेतकऱ्याच्या सातबाऱ्या वरील जमिनीपेक्षा ताब्यात असलेली जमीन कमी आढळल्यास जमीन कोरणाऱ्या वर कायदेशीर कारवाही करून त्याच्या ताब्यात  असलेली जमीन शेतकऱ्याला परत मिळवून देता येईल.

 वृत्तपत्रावरील जाहिरातीसाठी पहा


टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने