नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. पूर्वी माणसांच्या मूलभूत गरजांपैकी अन्न, वस्त्र, निवारा,या तीनच मूलभूत गरजा होत्या परंतु आता यामध्ये चौथ्या वस्तूची भर पडली आहे.ती म्हणजे मोबाईल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण मोबाईल शिवाय आता कोणतेही सरकारी काम करणे किंवा बँकेतील काम करणे किंवा अनेक क्षेत्रातील काम करणे फार अवघड आहे.
फसवणुकीचे प्रकार थांबवण्यासाठी ट्रायची एक नवीन मोहीम
मोबाईल मुळे जग अगदी जवळ आलेला आहे. मोबाईल मुळे क्षणा अर्ध्या क्षणात अनेक अनेक मोठमोठी कामे बसल्या जागी होत आहेत.परंतु ह्या मोबाईलचा अनेक ठिकाणी आपल्यासाठी फायदा तर झालेला आहेत परंतु अनेक ठिकाणी आपल्याला तोटा देखील झालेला आहे. यामध्ये एक प्रकार म्हणजे अनेक फ्रॉड फसवणुकीचे कॉल अनेक लोकांची डोकेदुखी बनली आहे.यामुळे अनेक लोकांची फसवणूक देखील झालेली आहे. त्यामुळे येणारा कॉल हा कुणाचा आहे. हा कळत नसल्याने आपण तो कॉल रिसिव्ह करतो.आणि त्यामुळे समोरचा व्यक्ती आपल्याला कुण्या संस्थाचा किंवा बँकेचा कर्मचारी भासवून फसवून जातो.अशा अनेकांच्या फसवणुकी झालेल्या आहेत त्यामुळे आता Telecom regulatory authority of india म्हणजेच ट्राय ने यावर एक तोडगा काढला आहे. म्हणजेच काय तर आपल्याला आलेल कॉल Unknown Number ला ओळख देण्याच्या तयारीत आहे.
ट्राय कॉलर आयडी सिस्टम
ट्राय कॉलर आयडी ही भारत सरकारची एक नवीन मोहीम आहे. ही मोहीम लागू करण्यासाठी या वर सरकार विचाराधिन आहे.Telecom regulatory authority of india आता एक योजना राबवत आहे जी म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाच्या सिम कार्ड ला त्याचे आधार लिंक असायला पाहिजे. व जेव्हा कुणी व्यक्ती कुणाला कॉल करेल तेव्हा कॉल केलेल्या व्यक्तीचा समोरच्या व्यक्तीला फक्त नंबर दिसला नाही पाहिजे, तर त्याचबरोबर त्याचे आधार वरील संपूर्ण नाव सुद्धा दिसले पाहिजे अशी ही योजना आहे.
परंतु आतापर्यंत या गोष्टीसाठी अनेकांच्या मोबाईल मध्ये ट्रू कॉलर नावाचे थर्ड पार्टी ॲप काम करत होते. या ट्रू कॉलर ॲपमुळे कॉल केलेल्या अनेकांची नावे समोरच्या व्यक्तीला दिसत होती परंतु यामध्ये सुद्धा काही त्रुट्याही होत्या.त्यामुळे गरज नसतानाही काहींचे कॉल आपल्याला उचलावे लागतात.
ट्राय कॉलर आयडी चा फायदा
यासाठीच या योजनेमुळे आता येणाऱ्या व्यक्तीचा कॉल हा त्याच्या नावानिशी समोरच्या व्यक्तीला दिसेल. त्यामुळे हा काल उचलायचा किंवा नाही हा तो स्वतःच व्यक्ती ठरवेल. त्यामुळे एखादा नवीन नंबर वरून आलेला कॉल चा सर्व नावानिशी डेटा आपल्याला दिसेल. त्यामुळे धोका आणि फसवणूक होण्यापासून अनेकांचा बचाव होईल . यामुळे ट्रू कॉलर या थर्ड पार्टी ॲप ची गरज सुद्धा संपेल.
भारत सरकारची योजना
टेलिकॉम रेगुलेटरी ऑफ इंडिया यावर तीन आठवड्या पर्यंत यावर काम चालू काय शकते. आलेल्या अहवालानुसार ही प्रक्रिया पूर्णपणे केवायसी बेसेड प्रक्रिया आहे ,त्यामुळे येणाऱ्या व्यक्तीच्या कॉलचा संपूर्ण डिटेल व संपूर्ण नाव हे समोरच्या व्यक्तीला कळेल. हे नाव स्वत:हून आपल्याला बदलता येणार नसून, आधार कार्ड किंवा सिम कार्ड खरेदी केलेले कोणतेही ओळखपत्र दाखवून,सिमचे नाव ट्राय कॉलर आयडी सिस्टीममध्ये नोंदवले जाईल, असा अंदाज सध्या वर्तवला जात आहे. तथापि, भारत सरकारवर ट्रायच्या या नवीन योजनेविषयी काय परिस्थिती आहे ही पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही. येत्या काही दिवसांत भारतात लागू होणारा हा नियम सरकारकडून ठळकपणे समोर येईल, अशी अपेक्षा आपण करूया.
अशा अनेक नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप इन्व्हाईट ग्रुप ला जॉईन व्हा