state government jobs:येत्या वर्षभरात 75 हजार युवकांना नोकरी देणार माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा! वाचा सविस्तर

             नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या माहिती लेखनामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो मागील तीन वर्षापासून कोरोना काळ असल्याने महाराष्ट्र शासनाने नवीन नोकऱ्या देण्याचे थांबवले होते. नोकऱ्यांवर अघोषित बंदी आली होती.परंतु येत्या वर्षभरात जवळपास 75 हजार युवकांना नोकरी देण्याची घोषणा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजनी परिसरातील सेंटर रेल्वे कम्युनिटी हॉल येथील एका कार्यक्रमात केली आहे.


येत्या एका वर्षात 75 हजार युवकांना नोकरी देण्याची माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

                 या व्यतिरिक्त केंद्र सर केंद्र सरकारने सुद्धा दीपोत्सवाच्या निमित्ताने देशभरात रोजगार मेळावा ठेवण्यात आला होता देशातील दहा लाख युवकांना पुढील 18 महिन्यात नोकरी देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे या उद्दिष्टेच्या पूर्ततेतूनच अंजली परिसरातील सेंट्रल रेल्वे कम्युनिटी हॉल कार्यक्रमाचे निमित्ताने या रोजगार मेळाव्यातील 213 जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यावेळी माननीय देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार जवळपास 75 हजार युवकांना येत्या वर्षभरात नोकरी देण्याची घोषणा केली आहे.


18 महिन्यांमध्ये दहा लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट


केंद्र शासनामार्फत पुढील १८ महिन्यात १० लाख तरुणांना विविध शासकीय विभागामध्ये नोकरी दिली जाणार आहे. दीपोत्सवाच्या पर्वावर हा रोजगार मेळावा देशभरातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आला होता . याच कार्यक्रमात नागपूर येथे अजनी परिसरातील सेंट्रल रेल्वे कम्युनिटी हॉल येथे या रोजगार मेळाव्यातील अनुषंगाने २१३ युवकांना नियुक्तीपत्र देण्यात आले. बँक, रेल्वे, पोस्ट, इन्कम टॅक्स यासह केंद्र शासनाच्या जवळपास ३८ विविध विभागांमध्ये ही नियुक्ती होणार आहे. 22 तारखेला एकाच दिवशी देशभरात ७५ हजार युवकांना नियुक्ती पत्र दिले गेले.


हे पण वाचा:-डिजिटल हेल्थ आयडी कार्ड (ABHA) बनवण्याचे मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आव्हान ! वाचा सविस्तर 


             प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संबोधनानंतर देशातील विविध भागात मान्यवरांच्या हस्ते 75 हजार युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यानंतर संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रात 10 लक्ष नोकरी भरतीचे लक्ष ठेवले आहे.राज्य शासनालाही अशावेळी मैदानात यावे लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आपल्या नेतृत्वातील राज्य सरकारची तरुणांना नोकरी देणे ही प्राथमिकता असणार आहे. 


 या अनुषंगाने प्रथम ग्रामविकास विभागत 10 हजार तर 18 हजार पोलीस भरती होणार 


                 येत्या वर्षभरात 75 हजार युवकांना सरकारी नोकरी दिली जाईल. त्याची सुरुवात लवकरच १८ हजार युवकांची पोलीस दलामध्ये भरती घेऊन ,तसेच १० हजार युवकांची ग्रामविकास विभागातील विविध पदावर भरतीद्वारे नोकरी दिली जाईल अशी घोषणा त्यांनी केली अधिक माहितीसाठी महासंवाद या वेबसाईटला भेट द्या

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने