नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखा मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो आजच नागराज मंजुळे यांच्या एका चित्रपटाचा ट्रिजर रिलीज झाला आहे. त्यामुळे सगळे नागराज मंजुळे फॅन खुश आहेत. नागराज मंजुळे यांचा खूप दिवसानंतर चित्रपट येतोय.
"घर बंदूक बिर्याणी" नागराज मंजुळे यांचा नवीन चित्रपट
दिवाळीच्या दोन दिवसा अगोदर नागराज मंजुळे यांनी आपल्या नवीन चित्रपटाचे पोस्टर रिलीज केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी आपल्या या चित्रपटाचे टीजर रिलीज केले आहे. यामध्ये स्वतः नागराज मंजुळे आर्मी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून येत आहे. तर सयाजी शिंदे व आकाश ठोसर हे आतंकवाद्यांच्या भूमिकेत दिसून येत आहे. आणि या टिझर मध्ये असे दाखवण्यात आले आहे की, या दोहो मध्ये चकमक चालू आहे.आणि या चित्रपटाचे नाव जर जाणून घ्यायचे म्हटले तर चित्रपटाचे नाव आहे "घर बंदूक बिर्याणी"
हिंदी ,मराठी आणि दक्षिणात्य दोन भाषेत प्रदर्शित होणार चित्रपट
सैराटच्या प्रचंड यशानंतर नागराज मंजुळे हे उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती निर्माण झाली .आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांना घेऊन त्यांनी सैराट बनवला होता. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पणाचा चित्रपट " झुंड" हा चित्रपट बनवला होता यामध्ये आकाश ठोसरने छोटीशी भूमिका साकारली होती. परंतु आता" घर बंदूक बिर्याणी" मध्ये आकाश ठोसर आणि नागराज मंजुळे आपणास एकत्र दिसणार आहे .या चित्रपटमध्ये आता त्यांनी एक नवीन कलाकार घेतला आहे.तो म्हणजे सयाजी शिंदे. सयाजी शिंदे म्हटलं तर चित्रपटाला आता एक वेगळाच दर्जा प्राप्त होणार आहे. हा चित्रपट हिंदी, मराठी, तामिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. परंतु या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख मात्र त्यांनी जाहीर केलेली नाही.
हे पण वाचा:- मंजुळे यांनी केली नवीन चित्रपटाची घोषणा ! या चित्रपटाचा बनणार दुसरा भाग ! जाणून घ्या सविस्तर
चित्रपटाचा टिझर फार सुंदर आहे तेव्हा तो आपण बघायलाच पाहिजे .त्यासाठी खाली लिंक वर जाऊन आपण तो बघावा नक्की बघा.
चित्रपटाचा टिझर: "घर बंदूक बिर्याणी"टिझर