Photo credit-pixabay.com
नमस्कार मित्रांनो KJ MEDIA च्या या नवीन माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो आज दीपावली. दीपावलीचा हा प्रकाशाचा सण भारत देशातच नाही तर भारताबाहेरील अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. दीपावली म्हटले की लक्ष्मीपूजन आले पण आपणास माहित आहे का? दीपावली आपण का साजरी करतो .आपण का महालक्ष्मीचे पूजन करतो आणि दीपावली कशामुळे आपण साजरी करतो. या दिवसाचे काय महत्व आहे जानुया हाच इतिहास. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.
दीपावलीच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास असे म्हणतात की प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येला दीपावलीच्या दिवशीच आले होते. तर दुर्गा मातेने या दिवशी कालीचे रूप धारण केले होते. व याच दीपावलीच्या दिवशी पांडव हे आपल्या वनवास तू मुक्त होऊन आपल्या घरी आले होते तर याच दिवशी भगवान महावीर यांना मोक्ष प्राप्त झाले होते.
सागर मंथनातून महालक्ष्मी प्रकटली होती
असे म्हणतात, की कार्तिक मासच्या अमावस्येच्या दिवशी माता महालक्ष्मी यांचे क्षिरसागर मधून प्रकट झाल्या होत्या त्यामुळे महालक्ष्मीचे स्वागत म्हणून आपण त्याची पूजा करतो असे म्हणतात की भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मी यांचा विवाह हा सुद्धा कार्तिक मास च्या अमावस्येच्या रात्री झाला होता.
श्रीरामचंद्र वनवास भोगून परत आल्याचां आनंद म्हणून हा उत्सव करतात.
अशी आख्यायिका आहे की प्रभू श्री रामचंद्र 14 वर्षे वनवासातून जेव्हा अयोध्येला परत आले होते तेव्हा अयोध्यावासीयांनी त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येला दिव्यांच्या प्रकाशाने पूर्ण व्यापून टाकले होते व असे स्वागत श्रीरामचंद्राचे अयोध्येतील नागरिकांनी केले होते त्यामुळे दरवर्षी श्री रामचंद्राचे स्वागत म्हणून दीपावलीचा उत्सव दिवे लावून आपण साजरा करत आलो आहोत असे म्हणतात.
दुर्गा मातेने याच दिवशी महाकालीचे रूप धारण केले होते
असे म्हणतात की दिवाळीच्या दिवशीच दुर्गा मातेने महाकालीचे रूप घेऊन राक्षसांचा सर्वनाश करायला सुरुवात केली होती परंतु राक्षसांचा विनाश करता करता अधिक क्रोधामुळे देवांचाही विनाश महाकाली करायला लागली होती. त्यामुळे हे थांबवण्यासाठी. तेव्हा शंकर महादेव यांनी महाकालीचा राग शांत करण्यासाठी स्वतः महाकालीच्या पायाखाली जाऊन झोपले जेव्हा महाकालीचे पाय महादेवांच्या छातीवर पडला तेव्हा महाकालीचा राग शांत झाला. त्यामुळे दिवाळीला महाकालीचे ही पूजन केले जाते.
भगवान महावीरांना दीपावलीच्या दिवशी मोक्ष प्राप्त झाले होते
जैन धर्मीय नागरिक दीपावली या उत्सवाला भगवान महावीर यांना मोक्षप्राप्तीचा दिवस म्हणून ही साजरी करतात. असे म्हणतात की कार्तिक मासच्या अमावस्येच्या दिवशी भगवान महावीरांना मोक्ष प्राप्त झाली होती. या दिवसाला आपण दीपावली म्हणतो. तर बौद्ध धर्माचे लोक दीपावलीला सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याचा दिवस म्हणूनही साजरा करतात. बौद्ध धर्मीय लोक या उत्सवाला "अशोक विजयादशमी"असेही म्हणतात त्यामुळे हे लोक मठांना सजवून प्रार्थना करून हा उत्सव साजरा करतात.
सूचना:- वरील लेख सामान्य माहिती ,ग्रंथ परंपरा आणि पौराणिक कथा यांच्या मान्यतेवर आधारित आहे याची KJMEDIA पुष्टी करत नाही.