नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखांमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो जीवन जगत असताना आपल्या आरोग्य विषयी अनेक अडचणी येत असतात. त्यामुळे आपल्याला आर्थिक स्थितीला सामोरे जावेच लागते परंतु आपल्याला आपल्या कुटुंबाची ही चिंता असते.की आपण नसल्यावर आपल्या कुटुंबाचे काय होणार त्यामुळे जीवन विमा हा आपल्यासाठी उपयुक्त ठरते परंतु आताचे जीवन बीमा प्रीमियम हे खूप महागडे असल्याने त्यामुळे आपण ते घेऊ शकत नाही किंवा त्याचे हप्ते आपण भरू शकत नाही.
पोस्ट ऑफिस ची नवीन योजना
परंतु आता चिंता करण्याची गरज नाही कारण पोस्ट ऑफिस ने एक नवीन विमा योजना आणली आहे.यामध्ये 399 ते 299 चा वार्षिक प्रीमियम भरून आपण 10 लाख रुपये पर्यंतचा अपघाती व कायमचे अति गंभीर अपंगत्व यावर सुद्धा हा विमा लागू होतो.त्या व्यतिरिक्त दवाखान्यातील खर्चावरील अनेक सुविधा आपल्याला मिळतात ,आणि आपल्या परिवाराला ही त्याचा थोडा लाभ मिळतो. चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे.
योजने बद्दल माहिती
1. या योजनेत व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांचे संरक्षण दिले जाते.
2.या योजनेत कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास विमाधारकाला 10 लाख रुपयांचे सुरक्षा कवच दिले जाते.
3. पोस्ट ऑफिस विमा योजना: अपघात झाल्यास रूग्णालयात भरती खर्चासाठी विमाधारकास रु. 60,000/- प्रदान करण्यात येतात.
4 .या पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेअंतर्गत, विमाधारकाच्या किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी 1,00,000 लाख रुपये दिले जातात.
4.या पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेत, विमाधारक व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्यास. तर 10 दहा दिवसाचा खर्च प्रत्येक दिवसाला एक हजार रुपये दिले जातात.
हे देखील वाचा:- जास्त उत्पन्न धारकांनो! राशन कार्ड करा बंद नाही तर होणार मोठी कारवाई! वाचा सविस्तर
5.या विमा योजनेत, विमाधारकाला रु.30,000/- चा OPD खर्च दिला जातो.
6.या पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेत विमाधारकाला अर्धांगवायू किंवा अपंगत्व झाल्यास 10 लाख रुपये दिले जातात.
7.या विमा योजनेअंतर्गत विमाधारकाच्या कुटुंबाला रूग्णालयात जाण्यासाठी प्रवास खर्च म्हणून रु. 25,000/- दिले जातात.
या योजनेतील लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे वय हे 18 ते 65 वर्षा दरम्यान असावे. या योजनेत भाग घेण्यासाठी आपणाला आपल्या जवळील पोस्ट ऑफिस ला भेट द्यावी लागेल याचा अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.त्यामुळे आपले पोस्ट पेमेंट बँक खाते असायला हवें नसेल तर आपणाला ते खाते खोलावे लागेल व नंतरच हा अर्ज केला जाऊ शकतो. आधिक माहितीसाठी आपल्या पोस्ट ऑफिस ला भेट द्या.
हे देखील वाचा:-सावधान ! चेक जारी कर्त्यांसाठी होणार एक कठीण नियम चेक बाउन्स झाला तर होणार दंड व शिक्षा वाचा सविस्तर