Photo credit-pixabay.com
नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो हे नुकतेच माननीय प्रधानमंत्री यांनी 5G या नवीन इंटरनेट तंत्रज्ञानाचे उद्घाटन केले आहे. या तंत्रज्ञाने आपणास इंटरनक्षेत्रात प्रचंड गती मिळणार आहे. त्यामुळे ऑनलाईन कामे ही अत्यंत सोपी होऊन जाईल परंतु हे असल्यावर सुद्धा तरीही एक नवीन तंत्रज्ञान भारतात येण्याची शक्यता आहे. ते म्हणजे सॅटॅलाइट इंटरनेट चला तर मग जाणून घेऊया या सॅटॅलाइट इंटरनेट बाबतीत सविस्तर .
भारतामध्ये नुकतीच 5G ही इंटरनेट सुविधा सुरुवात झाली आहे.परंतु टेलिफोन कंपन्या आता एक नवीन तंत्रज्ञान म्हणजेच सॅटॅलाइट इंटरनेट आणण्याचे तयारीत आहे जे म्हणजे ज्या ज्या भागात टावर उभारणे अतिशय जोखमीचे आहे.ज्या ग्रामीण भागासारख्या ठिकाणी इंटरनेटचे कनेक्टिव्हिटी पोहोचू शकत नाही. त्या ठिकानाना यांना टार्गेट करून आता टेलिकॉम कंपन्या या सॅटॅलाइट इंटरनेट भारतामध्ये लॉन्च करण्याची तयारी करीत आहे. सॅटॅलाइट इंटरनेट काय आहे? याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती असायला हवी, त्याबद्दल आम्ही सांगत आहोत पुढील प्रमाणे
काय आहे? सॅटॅलाइट इंटरनेट
सॅटॅलाइट इंटरनेट हे असे एक तंत्रज्ञान आहे जे आकाशात आपण सोडलेल्या उपग्रहाद्वारे डायरेक्ट इंटरनेटची रेंज मिळणार आहे .त्यामुळे ज्या ठिकाणी फायबर ऑप्टिकल आणि टॉवरची रेंज ज्या ठिकाणी मिळत नाही.त्या ठिकाणी डायरेक्ट उपग्रहद्वारे इंटरनेट देण्यात येईल त्यामुळे अशा ठिकाणांना जगाशी जोडण्यासाठी फार उपयोग होईल.
हे कसे काम करते.
आकाशात सोडलेल्या उपग्रहावर सर्विस प्रोव्हायडर आपले सिग्नल पाठवतील आणि युजरला रिसिवर च्या मदतीने हे सिग्नल घेता येतील. हे त्याच प्रकारात असेल जसे की आपल्या घरातील टीव्हीवर आपण उपग्रहाचे अँटेना च्या मदतीने तसेच सिग्नल आणतो . आपल्या घरातील डीश सारखे हे काम करत असल्यामुळे खराब हवामानामध्ये यावर परिणाम होऊ शकतो. परिणामी याची सिग्नल ही जाऊ शकतात त्यामुळे ढगाळ वातावरण मुळे या वर इंटरनेट चालू शकणार नाही.
या इंटरनेटची काय असेल स्पीड
सुरुवातीला याची स्पीड कमी आहे परंतु जसे जसे याचा प्रसार होत जाईल त्यावर काम करून यांची स्पीड वाढवण्यासाठी टेलिफोन कंपन्या यावर काम करतील. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मॅस्क यांच्या starlink कंपनीची स्पीड 50mbps ते 200mbps मिळत आहे.starlink ची अनेक देशात इंटरनेट सुविधा सुरू आहे. ही कंपनीने भारतात येण्यासाठी भारत सरकारला लायसन्स साठी अर्ज केला आहे.यामध्ये भारतामधील एअरटेल भारती आणि जिओ सारख्या टेलिकॉम कंपन्यांनी सुद्धा या उपग्रह इंटरनेट भारतामध्ये सुरुवात करण्यासाठी पावले उचलली आहेत.