नागराज मंजुळे यांनी केली नवीन चित्रपटाची घोषणा ! या चित्रपटाचा बनणार दुसरा भाग ! जाणून घ्या सविस्तर

      नमस्कार मित्रांनो KJ MEDIA च्या या नवीन माहिती लेखांमध्ये आपले स्वागत आहे.मित्रांनो आज आम्ही  आपणास  मनोरंजन क्षेत्रातील माहिती देत आहोत. 'नागराज पोपटराव मंजुळे' कदाचित हे नाव आपल्याला माहिती असेलच कारण महाराष्ट्रातील या व्यक्तीला  कोणी ओळखू न शकेल कदाचित असा व्यक्ती नसेल. नागराज पोपटराव मंजुळे' हे नाव घेतले म्हणजे सैराट'हा चित्रपट आपला डोळ्यासमोर येतो 'सैराट' या चित्रपटाने महाराष्ट्रामध्ये तुफान गर्दी जमवली आणि रातोरात नागराज पोपटराव मंजुळे यांना स्टार बनवले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र नागराज यांना ओळखू लागला. त् परंतु या चित्रपटा अगोदर आणि नंतर ही  त्यांनी काही चित्रपट बनवले होते . यामध्ये फॅन्ड्री,सैराट, नाळ, झुंड, हे  चित्रपट आहेत. या चित्रपटांनी सुद्धा त्यांना प्रेक्षकांच्या प्रशंशाचे पात्र ठरवले. आता यातील एका चित्रपटाचा दुसरा भाग घेऊन येण्याची त्यांनी घोषणा केली आहे.

               


       नागराज मंजुळे यांनी नुकतीच सोशल मीडिया वर आपली एक पोस्ट टाकून आपल्या नवीन चित्रपट नाळ 2 या सिनेमाचे दुसऱ्या भागाचे चित्रिकरण चालू केल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना नाळ या चित्रपटाचा दुसरा भाग पाहायला भेटणार आहे. खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नागराज मंजुळे हे आता नाळ 2 च्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहे . त्यांनी बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांना घेऊन झुंड हा चित्रपट  बनवून, बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. हा चित्रपट ही खूप छान होता. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट करून,प्रेक्षकांना नाळ2 या सिनेमाची घोषणा केली आहे.
                  नाळ या चित्रपटाचे  डायरेक्टर सुधाकर रेड्डी होते . श्रीनिवास पोकळे याने बाल कलाकार 'चैत्य' याची भूमिका केली होती व देविका दप्तरदार यांनी चैत्याच्या सावत्र आईची भूमिका केली होती व स्वतः नागराज मंजुळे यांनी चैत्याच्या वडीलाची भूमिका केली होती. या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये वाह वाह मिळवली होती.

  


नागराज यांनी नुकतीच एक पोस्ट

     नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावर नुकताच एक फोटो टाकला आहे.ज्यामध्ये सुधाकर रेड्डी, श्रीनिवास पोकळे,देविका दप्तरदार व स्वतः नागराज मंजुळे नाळ या चित्रपटाच्या वेशभूषेमध्ये दिसत आहे. आणि या फोटोच्या खाली त्यांनी असे लीहले आहे की "मागच्या महिन्यात सुधाकरने अचानक फोन करून सांगितलं की नाळचा दुसरा भाग लिहिलाय . ऐकायला कधी भेटुयात ? नाळ चा दुसरा भाग काय होऊ शकतो याबाबत माझ्याही मनात उत्सुकता तयार झाली . स्क्रिप्ट ऐकली ती इतकी अनपेक्षित तरीही सहज नि भारी होती की दोन महिन्यांच्या जय्यत तयारीनिशी फिल्मचं शूटिंग झटक्यात सुरू केलं . पहिल्या " नाळ " प्रमाणेच ' नाळ'चा दुसरा भागही संस्मरणीय होईल अशी आशा आहे ! " नाळ 2 " च्या नावानं चांगभलं !!! असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.त्यामुळे नाळ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची शूटिंग चालू झाली आहे. यावरून असे दिसते त्यामुळे हा चित्रपट कधी येईल  याची अजूनही त्यांनी माहिती दिली नाही परंतु प्रेक्षकांना नाळ 2 या चित्रपटाची वाट पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने