7 ते 13 ऑक्टोंबर पर्यंत आला पंजाबराव डंख यांचा हवामान अंदाज ! महाराष्ट्रातील या ठिकाणी पडणार पाऊस शेतकरी मित्रांनी व्हावे सतर्क.वाचा सविस्तर

  


   नमस्कार मित्रांनो हे KJMEDIA च्या नवीन माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या परतीचा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे आता दोन दिवसापासून पावसाने चांगलीच उघडीप दिली होती.परंतु आता भारतीय हवामान खात्याने परत पाऊस पडण्याची शक्यता दाखवली आहे. तेव्हा शेतकरी मित्रांनी   आपले शेतीतील पिके ही सुरक्षित करून घ्यावी असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

         महाराष्ट्राचे प्रसिद्ध हवामान तज्ञ डॉक्टर पंजाबराव डंख यांचा सुद्धा एक नवीन अंदाज आला आहे. पंजाबराव डंख चे अंदाज हे जवळपास संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत.कारण ते अंदाज जवळजवळ योग्य ठरतात. त्यामुळे त्यांच्या अंदाजाला महाराष्ट्रातील शेतकरी वर्गामध्ये फार मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे पंजाबराव डंख यांचा अंदाज .

7 ते 13 ऑक्टोबर  पर्यंत आपले पिके सुरक्षित करून घ्यावे डंख यांचे असे आवाहन .

                 पंजाबराव डंख यांच्या सुधारित हवामान अंदाजानुसार त्यांच्या मते 13 ऑक्टोंबर या तारखेपर्यंत हा अंदाज आलेला आहे.त्यांच्या मते 6 तारखेपर्यंत जवळपास हवामान हे कोरडे राहणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनी आता सध्याला काढणीला आलेली सोयाबीन आपापल्या परीने सुरक्षित करून घ्यावी. असा सल्ला पंजाबराव डखं यांनी दिला आहे. 

         6 ते 9 ऑक्टोबर ला महाराष्ट्रामध्ये नाशिक आणि विदर्भ या विभागात पावसाची शक्यता आहे. तर 8 ते 9 या दोन दिवसात पूर्व विदर्भ ,पश्चिम विदर्भ  मराठवाडा , कोल्हापूर, सातारा ,सांगली या विभागात पावसाची शक्यता आहे. तसेच 9 ते 10 या कालावधीत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा ,कोल्हापूर, सातारा ,सांगली आणि अहमदनगर या विभागात पावसाची दाट शक्यता आहे.

        याशिवाय 10 ते 13 ऑक्टोंबर पूर्व विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र,मुंबई या सर्व ठिकाणी पावसाची शक्यता आहे,  उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने