नमस्कार मित्रांनो की KJMEDIA च्या नवीन लेखांमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आपल्या नोटावर महात्मा गांधींच्या फोटो च्या बाबतीत जाणून घेऊया महात्मा गांधींचा फोटो नोटावर का व केव्हा टाकण्यात आला,याची सविस्तर माहिती म्हणजेच इतिहास आपण जाणून घेऊया.
photo credit-pixabay.comभारत स्वतंत्र झाल्यानंतर सुरुवातीला भारतीय चलनांवर महात्मा गांधींचा फोटो नव्हता. मात्र, काही काळा नंतर आधी काही नोटांवर आणि कालांतराने सर्वच नोटांवर महात्मा गांधींचा फोटो छापला जाऊ लागला. विशेष म्हणजे या मधल्या काळात भारतीय नोटांच्या आकारात व चित्रांमध्ये अनेक बदल केले गेले. मात्र,महात्मा गांधींचा फोटोला कायम ठेवण्यात आले. महात्मा गांधीजींची काल २ ऑक्टोबर रोजी जयंती अनेक शासकीय कार्यालय व अनेक खाजगी ठिकाणी साजरी झाली. त्या निमित्ताने नोटांवर महात्मा गांधींचा फोटो नेमका कोणत्या साली व का? छापण्यात आला त्याची सविस्तर माहिती आपण घेऊयात .
भारतीय नोटांचं स्वरुप इग्रज काळापासूनच तर स्वातंत्र्यानंतर व आतापर्यंत बदलत आलं आहे. इंग्रज काळात भारतीय नोटांवर ब्रिटनच्या राजाचं चित्र होतं. मात्र, आपल्या भारत देश १५ ऑगस्ट १९४७ मध्ये स्वातंत्र मिळाल्यानंतर हे चित्र बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी सारनाथ येथील अशोक स्तंभावरील सिंहाचा फोटो घेण्यात आला होता. स्वतंत्र भारतातील भारत सरकारने पहिली नोट १९४९ मध्ये छापली आणि. ती नोट एक रुपयांची होती.
सर्वप्रथम महात्मा गांधींचा फोटो नोटेवर केव्हा छापला गेला?
१९६९ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रथम एक रुपयाच्या नोटेवर गांधीजींचा फोटो छापला होता. त्यानंतर १८ वर्षांनी म्हणजेच १९८७ मध्ये महात्मा गांधींचा फोटो असलेली ५०० रुपयांची नोट छापण्यात आली. पुढे १९९६ नंतर सर्वच नोटांवर महात्मा गांधींचा फोटो छापण्यात येऊ लागला.
आपल्या नोटांवर गांधीजींचा फोटो का आहे?
भारतीय रिझर्व्ह बँकेने बनावट नोटा छापल्या जाऊ नये म्हणून, भारतीय चलनावर अनेक ऐतिहासिक चिन्हं आणि चित्रे घेतली आहे. मात्र, कोणत्याही निर्जीव वस्तूचं चिन्ह तयार करणे किंवा फोटोची नक्कल करणं आणि बनावट नोटा तयार करणं तसं तुलनेने सोपं होतं. त्यामुळेच बनावट नोटांवर प्रतिबंध घालण्यासाठी गुंतागुंतीची रचना असलेल्या मानवी चेहऱ्याचा वापर करण्यात यावा असा विचार पुढे आला.
नोटांवर मानवी चेहऱ्याचा फोटो छापण्याचा विचार पुढे आल्यानंतर नेमका आता कुणाचा फोटो छापायचा यावरही अनेक चर्चा झाल्या. यात मध्ये अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या नावावरही चर्चा झाली. मात्र, बहुतांश स्वातंत्र्यसैनिकांची देशाच्या काही ठराविक क्षेत्रा पर्यंत च त्या भागात ओळख होती.
याच कारणामुळे त्या क्षेत्रापर्यंतच ओळख असलेल्या व्यक्तीचा जर फोटो छापल्यास देशात वाद निर्माण होऊ शकतो , अशीही शक्यता वर्तवण्यात आली. या सगळ्यांमध्ये महात्मा गांधी ना संपूर्ण देश ओळखत होता. त्यामुळे नोटांवर महात्मा गांधींचा फोटो छापण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
आपल्या भारतीय नोटावर असलेला महात्मा गांधींचा फोटो कुठून घेतला गेला?
महात्मा गांधींचे अनेक प्रकार चे फोटो उपलब्ध आहेत. त्या फोटोंमध्ये वयानुसार त्यांच्या चेहरापट्टीत बदलही झालेले दिसतात. मात्र, नोटांवर नेमका कोणता फोटो घेण्यात आला याविषयी अनेकांना उत्सुकता असते. या फोटोची एक खास गोष्ट आहे आणि हा फोटो कोलकात्यात काढण्यात आला होता.
महात्मा गांधी तत्कालीन म्यानमार आणि भारताचे ब्रिटिश सचिव फ्रेडरिक पॅथिक लॉरेन्स यांना कोलकात्यातील ‘व्हाईसराय हाऊस’मध्ये भेटले होते. त्याच ठिकाणी महात्मा गांधींचा एक फोटो काढण्यात आला होता. त्यावरूनच नोटांवरील फोटो घेण्यात आला.
माहिती सौजन्य:-लोकसत्ता मराठी न्यूज