जास्त उत्पन्न धारकांनो! राशन कार्ड करा बंद नाही तर होणार मोठी कारवाई! वाचा सविस्तर

     


        नमस्कार मित्रांनो KJMEDIA मीडियाच्या नवीन लेखांमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो कोरोना काळात केंद्र सरकारने आपल्याला राशन कार्ड मार्फत मोफत धान्य पुरवठा केला आहे. आणि आता सध्या डिसेंबर पर्यंत  आपल्यला मोफत धान्य पुरवठा होणार आहे. 

अपात्र लोक ही घेत आहेत फायदा

       सरकारच्या असे निदर्शनास आले आहे की काही जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांना राशनच्या धान्याची मोफत गरज नसून हे उत्पन्न धारक  रेशन कार्डद्वारे मोफत रेशन धान्य  घेऊन दुसरीकडे विकत असतात. असे आढळले आहे.त्यामुळे असे फसवणूक करणारे राशन कार्ड धारकांना कमी करण्यासाठी शासनाने  आवाहन केले आहे. की त्यांनी आपले राशन कार्ड शासकीय तहसील कार्यालयात किंव्हा एस डी एम कार्यालयात सपूर्द करावे व स्वतःच्या मर्जीने आपले राशन हे बंद करावे. नसता जर शासनाने राशन कार्ड ची पडताळणी केल्या नंतर  जास्त उत्पन्न आढळल्यास  मोठी कारवाई होऊ शकते अशी माहिती मिळत आहे.

काय आहे नियम?

              जर एखाद्या रेशन कार्डधारकाकडे स्वतःच्या उत्पन्नातून मिळालेला 100 चौरस मीटरचा प्लॉट/फ्लॅट किंवा घर असेल, चारचाकी वाहन/ट्रॅक्टर, शस्त्र परवाना, गावात दोन लाखांपेक्षा जास्त आणि शहरात वर्षाला तीन लाखांपेक्षा अधिक कौटुंबिक उत्पन्न असेल अशा लोकांनी रेशनकार्ड तहसील आणि डीएसओ कार्यालयात स्वइच्छेने सपूर्द करावे लागेल . नसता जेव्हा शासनाने चौकशी केल्यानंतर आढळल्यास मोठी कारवाई होऊ शकते व आतापर्यंत घेतलेले संपूर्ण राशन हे शासनाला परत करावे लागेल .

     त्यामुळे वरील गोष्टी आपल्या जवळ असतानाही आपण राशन कार्ड चा फायदा घेत असल्यास शासन सर्व राशन कार्ड च्या पडताळणी करणार आहे .त्यादरम्यान आपण या प्रकरणात आढळले गेल्यास आपल्यावर मोठी कारवाई होऊ शकते. त्यामुळे आपली राशन कार्ड ही रद्द होऊ शकते आणि आतापर्यंत आपण घेत आलेले राशन आपल्याला पूर्ण परत करावे लागणार आहे त्यामुळे या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावे धन्यवाद


टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने