Photo credit:-pixabay.com
नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखात आपले स्वागत आहे.मित्रांनो नुकतेच माननीय पंतप्रधान मोदी यांनी 5g या नवीन नेटवर्क तंत्रज्ञानाचे उद्घाटन केले आहे. या 5g नेटवर्कमुळे आताच्या 4g इंटरनेट पेक्षा दहा पटीने स्पीड वाढणार आहे. त्यामुळे इंटरनेट वरील सर्व कामे अगदी सोपे होतील ऑनलाइन कामे ही काही क्षणात होतील.
10000 रूपयांपेक्षा जास्त किंमतीच्या मोबाईल मध्ये 5g नेटवर्क असेल
परंतु आता मोदी सरकारने 5g नेटवर्क दिल्याने कंपन्यांना एक नवीन आदेश जारी केला आहे यामध्ये म्हटले आहे की मोबाईल निर्मिती कंपन्यांनी टप्प्याटप्प्याने 10000 रुपया पेक्षा जास्त किमतीचे मोबाईल आता 5g तंत्रज्ञानाने निर्मित करावे व त्याची विक्री करावी 10000 रुपया पेक्षा खालील मोबाईल 4g नेटवर्कमध्ये असले तरी चालतील त्यामुळे कंपन्यांना आता मोठा आर्थिक पेच पडला आहे. कारण 10000 रुपया पेक्षा जास्त किमतीच्या 4g मोबाईलची विक्री ही चांगल्या प्रकारे मोबाईल कंपन्यांची होत होती परंतु आता ह्या नवीन नियमाने कंपन्यांना आपले धोरण बदलावे लागणार आहे.
5g सपोर्ट स्मार्टफोन निर्मितीवर भर देण्याचे केंद्राचे आदेश
मोदी सरकार आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये नुकतीच एक महत्वाची बैठक झाली होती. या बैठकीत 5G नेटवर्क आणि 5G स्मार्टफोन वर काही महत्व पूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये 5G स्मार्टफोनमध्ये लवकरात लवकर 5G सपोर्ट सॉफ्टवेयर अपडेट देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच 5g स्मार्टफोनची निर्मिती व उपलब्धता वाढविण्यासाठी ही जोर देण्यात आला आहे.
टप्प्याटप्प्याने 4g फोन बंद होतील
यासाठी 10000 हजार रुपयांपेक्षा किंमतीच्या प्रत्येक फोनमध्ये 5g असायला हवे, असे सांगण्यात आले आहे. यामुळे 10000 हजारांपेक्षा कमी किंमतीच्या फोनमध्ये 4g मिळण्याची शक्यता आहे. यामुळे काही कंपन्या 4g फोन बनविणे देखील बंद करण्याची शक्यता आहे. स्मार्टफोन कंपन्यांनी टप्प्याटप्प्याने 10,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 4G स्मार्टफोनचे उत्पादन थांबवावे, असे दूरसंचार विभाग (DoT) ने बैठकीत सुचवले आहे. यामुळे यूजर्सना 4G वरून 5G स्मार्टफोनवर शिफ्ट करणे सोपे होणार आहे, असेही dot चे म्हणणे आहे. मध्यम वर्ग श्रेणीतील ग्राहकांना 5G कनेक्टिव्हिटी असलेले स्मार्टफोन उपलब्ध करून दिले जातील. यामुळे या फोनची किंमत वाढण्याची शक्यता आहे.
कंपन्यांना हार्डवेअर सपोर्ट आणि मोठी गुंतवणूक ची शक्यता वाढणार त्यामुळे मोबाईलच्या किमती वरती परिणाम होईल
रिअलमी सारख्या स्मार्टफोन मोबाईल कंपन्यांनी 12,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सर्व स्मार्टफोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटी दिली जाईल, असे अधिच जाहीर केले होते. बजेट मधील स्मार्टफोन श्रेणीतील कंपन्यांसाठी हे त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. 4G वरून 5G वर जाण्यासाठी जास्त गुंतवणूक आणि हार्डवेअर सपोर्टची गरज भासणार आहे. काही स्मार्टफोन कंपन्या 10,000 रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या 4G स्मार्टफोनची चांगली विक्री करत असल्याकारणाने त्या कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.