सावधान ! चेक जारी कर्त्यांसाठी होणार एक कठीण नियम चेक बाउन्स झाला तर होणार दंड व शिक्षा वाचा सविस्तर

    


           नमस्कार मित्रांनो KJ MEDIA च्या नवीन माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याला कोणाला जर पैसे द्यायचे असेल तर आपण ते मोबाईल द्वारे किंव्हा ऑनलाईन यूपीआय पद्धतीने देतो किंवा कॅश देतो किंवा चेक द्वारे आपण कोणाची पेमेंट करतो परंतु मोठमोठे उद्योजक व व्यावसायिक लोक  हे चेक द्वारे च जास्त  प्रमाणात पेमेंट करतात.  चेक ने पेमेंट करणे हे उद्योजक व व्यवसायांसाठी अगदी सोपे असते. त्यामुळे त्यांना त्यांच्याजवळ मोठी रक्कम सोबत ठेवावी लागत नाही. फक्त चेकबुक ठेवून त्यावर रक्कम टाकून त्यावर सही मारून तो समोरील व्यक्तीच्या नावे द्यावां लागतो.  म्हणजे व्यावसायिकाला किंवा उद्योजकाला बँकेपर्यंत  रक्कम घेण्यासाठी जावे लागत नाही. व आपल्या खात्यातील पैसे हे ज्या व्यक्तीच्या नावे आपण चेक दिला आहे.त्याच्या खात्यावर बँांमार्फत ट्रान्सफर होतात.

            परंतु आता काही चेक जारी करते बँकेत पैसे नसतानाही आपले चेक देऊ करत आहे. परंतु चेक जारी कर्त्याच्या अकाउंट मध्ये पैसे नसल्याच्या कारणाने चेक बाउन्स होण्याचे प्रकार वाढले आहेत. पैसे देण्यापासून वाचण्यासाठी चेक जारीकर्त्यांसाठी ही एक पळवाटच आहे. व या चेक बाउन्स  प्रकरणा साठी सरकारचा याला असा काही  कडक नियम नाही .त्यामूळे दिवसेंदिवस अशा  फ्रोड  चेक जारीकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणी न्यायालयात जाऊन या प्रकरणांचा निकाल फार संथ गतीने होतो. त्यामुळे चेक देणाऱ्यांना पैसे न देण्यापासून वेळ भेटतो. वर्षानुवर्षे हे प्रकरणे न्यायालयात चालू असतात 

केंद्रीय वित्त विभाग आणू शकतो यावर एक कडक नियम

          यामुळे आता केंद्र सरकार मधील वित्त विभाग यामध्ये एक कडक नियम आणण्यासाठी विचार करत आहे. चेक बाउन्स होणे हे प्रकरने अति जास्त प्रमाणात होत .असल्याने वित्त विभागाने नुकतीच एक बैठक घेतली होती या बैठकीमध्ये चेक बाउन्स प्रकरणाचे अनेक मुद्दे उपस्थित झाले. त्यामुळे यावर आळा बसण्यासाठी काही कडक नियम आणण्यासाठी वित्त विभाग विचार करत आहे.

असा असू शकेल नियम

         एखाद्या बँक अकाउंट धारकाने   पैसे देण्यासाठी कुणाचे नावे चेक दिला असेल परंतु बँकेत अकाउंट मध्ये पैसे नसल्याकारणाने तो चेक बाउंस झाला. तर चेक जारी कर्त्याला त्याच्या दुसऱ्या बँकेतील अकाउंट मधून आपोआप पैसे कापले जाईल . त्याच्या  सर्व बँक अकाउंट मधील पैसे काढण्यावर  काही दिवसांसाठी बंदी आणण्यात येईल. त्याचे नवीन बँकेत अकाउंट उघडले जाणार नाही.त्यामुळे कर्ज प्रकरणांमध्ये उपयोगी असणारा त्याचा क्रेडिट स्कोर ही कमी करण्यात येईल. अशी माहिती समोर येत आहे.

चेक बाउन्स रकमेच्या दुप्पट दंड व दोन वर्षाचा कारावास ही होऊ शकतो   .  

               हा नियम लागू झाला तर चेक बाउन्स प्रकरणा ला एक दंडणीय अपराध मानून दोन वर्षाची जेल होऊ शकते. किंवा बाउंस झालेल्या चेक द्वारे व्यक्तीला देण्यात  येणाऱ्या रकमेच्या दुप्पट दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे बँकेत पैसे नसतानाही चेक देणाऱ्यांची संख्या कमी होईल किंवा याच्यावर आळा बसेल.

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने