नमस्कार मित्रांनो KJMEDIA तर्फे आपले स्वागत आहे. आज आपण आपल्याला एक नवीन लेखासोबत भेटत आहोत तो म्हणजे आता जनावरांचाही आधार नंबर येणार आणि त्यांचेही आधार कार्ड बनणार चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.
आज आपण कुठेही बाहेर फिरायला गेलो तर आपल्याला आधार कार्डची खूप गरज भासते. कारण देशात कुठेही ओळखीचा पुरावा म्हणून आधार ला मान्यता आहे. त्यामुळे आधार कार्ड हे किती महत्त्वाचे आहे. हे समजते कोणतेही सरकारी कार्यालयामध्ये कोणतेही सरकारी काम करण्यासाठी ओळख पुरावा म्हणून आधार कार्ड ला फार महत्त्व आहे. परंतु हे झाले आता आपले व्यक्तींचे आधार कार्ड, पण आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे जनावरांचेही आधार कार्ड बनवणे. जनावरांची ही आता बायोमेट्रिक ओळख म्हणून आधार कार्ड बनवण्यात येणार आहे. हा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आज महाराष्ट्रात व देशात लंम्पी या आजाराने फार थैमान घातला आहे जनावरांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात फैलताना दिसत आहे त्यामुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण खूप प्रमाणात वाढले आहे. जनावरवर इलाज करताना जनावराची ओळख पटत नाही. त्यामुळे त्यांच्यावर इलाज व्यवस्थित होऊ शकत नाही. तेव्हा प्रत्येक जनावराची एक वेगळी ओळख म्हणून सरकारने जनावरांचे आधार कार्ड बनवण्याची घोषणा केली आहे.
जनावरांच्या या आधार कार्ड मुळे जनावरांचे दुग्ध व्यवसाय व डेअरी उद्योगांच्या अनुषंगाने दुग्ध जनावरांची डेटा व्यवस्थापित करण्यासाठी त्यां त्या जनावरांची ओळख असणे महत्त्वाचे असते. त्यामुळे या सर्व डिटेल्स संकलन करून त्यांच्यासाठी अनेक उपाय योजना करून दूध व्यवसाय व्यवसायाला चालना देण्यासाठी सरकारचा हा निर्णय आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय नक्कीच स्वागतहर्य आहे. त्यामुळे जनावरांच्या बाबतीत संपूर्ण माहिती असणे हे फार महत्त्वाचे आहे. जनावरांपासून मिळणाऱ्या दुधाचे सेवन केल्याने माणसाला ही हा आजार होऊ नये त्यासाठी ही खबरदारी सरकार आता घेत आहे. त्यामुळे जनावरांचे आधार बनल्याने त्यांची ओळख पटू शकेल आणि त्यामुळे एक विशिष्ट क्रमांक असल्याने जनावरांचे उपचार व अनेक उपाय योजना करण्यासाठी एक चांगली मदत मिळेल.
सध्या महाराष्ट्रासह देशांमध्ये लम्पी या आजाराने फार थैमान घातले आहे . जनावरांना यामध्ये खूप प्रमाणामध्ये ताप येऊन त्यांच्या अंगावर फोड येण्याचा प्रकार दिसत आहे. हा रोग झपाट्याने पसरत आहे या त्वचारोगामुळे जनावरे दगावत आहे. कोरोनामध्ये कोरोना रुग्णांना आधार व काही ॲप्स चा उपयोग करून या कोरोना रुग्णांना ट्रेस केले होते तशाच प्रकारे जनावरांनाही आधार कार्ड बनवल्यानंतर ट्रेस केल्या जाऊ शकेल असाही सरकारच्या मानस आहे. पशूंचे आधार बनवणे ही सरकारने आता फक्त घोषणा केली आहे .त्याची अजून अंमलबजावणी करण्यास भरपूर वेळ लागू शकतो. लंपी या आजाराची लस ही आता उपलब्ध आहे व अजून काही संशोधन त्याच्यावर चालू आहे. त्यामुळे जोपर्यंत जनावरांचे आधार कार्ड बनवण्याची ही योजना चालू होईल तोपर्यंत लम्पी आजार हा गेलेला असेल. ही योजना राबवण्यासाठी अजून भरपूर अवकाश आहे .त्यामुळे हे जेव्हा ही आधार कार्ड बनेल तेव्हा खूप फायद्याचे राहील त्यामुळे जनावरांना एक ओळख मिळून शेतकऱ्याला जनावरांच्या अनेक शासकीय योजनांचा फायदा घेता येऊ शकेल. तसेच सरकार नोंदणीकृत जनावरांना लाभ देऊ शकेल.