चिता आणि बिबट्या मध्ये काय आहे फरक? दोन्ही सारखे दिसतात वाचा सविस्तर माहिती

         नमस्कार मित्रांनो KJMEDIA  या नवीन लेखात आपले सहर्ष स्वागत करीत आहे.चला तर आज जाणून घेऊया,  माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2022 रोजी नामीबिया या देशातून 8 चित्ते भारतात आणून भारतातील जंगलांना एक परिपूर्णत्व देण्याचा प्रयत्न केला आहे.आणि त्या चीत्याना भारतातील उत्तर प्रदेशातील शोपुर येथील कुनो नॅशनल पार्क मध्ये त्यांचे पुनर्वसन करणार आहेत.  पण भारतात चित्ते आणत असताना लोकांच्या मनात एकच प्रश्न होता. चिता आणि बिबट्या मध्ये काय फरक आहे,कारण दोन्हीही सारखे दिसतात. भारतामध्ये बिबट्या हा उपलब्ध होता परंतु चित्ता हा जवळपास 70 वर्षांपूर्वी नामशेष झाला होता.  तेव्हा चिता आणि बिबट्या यामध्ये काय फरक आहे व ते कसे ओळखले जाऊ शकतात चला तर मग जाणून घेऊया. 

      photo credit- pixabay.com

चिता आणि बिबट्या या मधील शारीरिक फरक  

 चीत्याचे खांदे हे बिबट्याचे खांद्यापेक्षा मोठे असतात. ते बिबट्या पेक्षा उंच दिसतात.  चीत्याचे जेमतेम वजन हे 72 किलोग्रॅम असते. आणि तो ताशी 120 किलोमीटर प्रति वेगाने धावू शकतो. आणि बिबट्याच्या बाबतीत जर माहिती घ्यायची म्हटलं तर  चित्याच्या पेक्षा बिबट्या हा शरीराने मजबूत असतो बिबट्याचे वजन हे शंभर किलो ग्रॅम पर्यंत असते. बिबट्या हा आपल्या शिकारीला पकडण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावून शिकार करतो. आणि आपली शिकार सुरक्षित राहण्यासाठी  तो त्या आपल्या शिकारीला झाडावरही घेऊन जाऊ शकतो.

चित्याच्या आणि बिबट्याच्या कातड्यामध्ये काय फरक असतो

                दूसरी माहिती अशी की, चित्याच्या आणि बिबट्याच्या कातड्यामध्ये काय फार फरक असतो. चित्याची त्वचा ही हलकी पिवळी व पांढऱ्या रंगाची असते तर बिबट्याची त्वचा ही पिवळ्या रंगाची असते. चित्याच्या अंगावर हलके काळया रंगातील अंडाकृती  टिपके असतात, तर बिबट्याचे अंगावरील चट्टे हे काही विशेष निश्चित नसतात.


चिता व बिबट्याच्या पंजा मधील काय फरक असतो

    चित्याच्या आणि बिबट्याच्या पंजा मध्ये  खूप मोठा फरक असतो. चित्याचे पंजे हे धावण्यासाठी फार मजबूत व मदतगार असतात . चित्याचे मागील पाय हे पुढच्या पायांपेक्षा मोठे व मजबूत असतात. त्यामुळे ते जास्त वेगाने धावू शकतात. तर बिबट्याचे  मागील पायापेक्षा पुढचे पाय हे मोठे असतात . त्यामुळे ते शिकार ला सुरक्षित ठेवण्यासाठी सहजतेने आपल्या शिकारीला झाडावर घेऊन जाऊ शकतात.आपल्या शिकारीला पकडण्यासाठी बिबट्याचा समोरील पंजा  हा फार उपयोगी पडतो.

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने